अतिवृष्टीच्या भयाने संजय गांधी उद्यान बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - पावसाचा जोर कायम राहिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद ठेवण्यात आले. या उद्यानाचे 29 ऑगस्टच्या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बुधवारी उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, असे सहायक वनसंरक्षक पी. भालेराव यांनी सांगितले. 

मंगळवारीही पावसाने उद्यानाला झोडपून काढले. उद्यानातील प्रशासकीय कार्यालयाचे 29 ऑगस्टला नुकसान झाले होते. त्यामुळे बुधवारी कार्यालयातील सर्व कागदपत्रे अन्यत्र ठेवण्यात आली होती. वन अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच येथे कार्यालय पुन्हा सुरू केले होते; परंतु मंगळवारी पावसाची धास्ती लक्षात घेऊन वेळीच कार्यालय बंद करण्यात आले. बुधवारी झालेल्या पावसात फारसे पाणी न तुंबल्याने वन अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

जवळच्या झोपड्यांतील वनमजूर आणि कुटुंबीयांनाही वेळेवर अन्यत्र हलवण्यात आले होते. या उद्यानाचे 29 ऑगस्टच्या मुसळधार पावसात तब्बल 7 कोटी 83 लाखांचे नुकसान झाले होते. रस्ते, पूल, भिंती, कार्यालय आणि मिनी ट्रेनच्या स्लीपरना पावसाचा फटका बसला होता. 

Web Title: mumbai news heavy rain sanjay gandhi park