ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

आज (सोमवारी) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी या कंटनेर आणि त्यावर केबल्सनी ठाणेकरांचा महत्त्वाचा रहदारीचा घोडबंदर रोड अडवून धरला.

ठाणे : अवजड केबल्सनी भरलेला कंटेनर माजीवडा पुलावर उलटून झालेल्या विचित्र अपघातामध्ये कंटेनेरमधील केबल्स पुलाखालील रस्त्यावर कोसळून रस्ता बंद झाला. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.

आज (सोमवारी) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी या कंटनेर आणि त्यावर केबल्सनी ठाणेकरांचा महत्त्वाचा रहदारीचा घोडबंदर रोड अडवून धरला. या केबल्स आणि कंटेनर हटवण्यासाठी क्रेन्स आणण्यात आल्या. परंतु सोमवारी सकाळी नोकरदारवर्गाची कामावर जाण्याची घाई सुरू झाली आणि महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण झाली.

या महामार्गावरील दोन्ही बाजूला पाच ते सहा किमीपेक्षा जास्त वाहनांची वाहतुक कोंडी झाली होती. याचा फटका कामावर जाणाऱ्या ठाणेकरांबरोबरच शालेय विद्यार्थी आणि अन्य अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांना झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिला. वाहतुकीचा अडथळा दुर करून वाहतुक सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सांगितले. 

Web Title: Mumbai news heavy road traffic congestion in Thane