अवजड वाहनांना दक्षिण मुंबईत बंदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई - वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी अवजड वाहनांना दक्षिण मुंबईत सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंदी असणार आहे; तर या वेळेत वाहने रस्त्यावर उभी करण्यासही बंदी असेल. वाहनतळातच वाहने उभी करावीत, असे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत. 

 मुंबईत मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतुकीच्या मार्गिका कमी केल्या अाहेत. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहनांना दक्षिण मुंबईत बंदी आणली होती. नव्या सूचनेनुसार यापुढे दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत बंदी असणार आहे. आपत्कालीन वाहने, सरकारी वाहने, बस, पाणी-दूध पुरवठा करणारी वाहने, पेट्रोल-डिझेल टँकर, पोलिस व अग्निशमन दलाच्या वाहनांना यातून वगळले आहे. अवजड वाहनांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पी. डिमेलो मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर, सेनापती बापट मार्गावर जाण्यास परवानगी आहे. अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी असेल. रस्त्यावर वाहने उभी केल्यास कारवाई केली जाणार आहे.

Web Title: mumbai news heavy vehicle ban in south Mumbai