हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी अपमृत्यूची नोंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - 'ओएनजीसी'चे पवनहंस हेलिकॉप्टर समुद्रात कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो तपासाकरता येलोगेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. येलोगेट पोलिस त्याचा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला सादर करणार आहेत.

"ओएनजीसी'चे अधिकारी हेलिकॉप्टरमधून अरबी समुद्रातील तेल केंद्राकडे जात होते. हेलिकॉप्टर कोसळल्याने सहा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्या एका वैमानिकाचा शोध सुरू आहे. सहा जणांच्या मृत्यूप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी "ओएनजीसी'च्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिसऱ्या दिवशी तटरक्षक दलाने "सीजी सम्राट' या बोटीच्या मदतीने मुंबई आणि दमण येथून अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे आणखी काही अवशेष बाहेर काढले.

Web Title: mumbai news helicopter accident register