मुंबई उच्च न्यायालयातील 14 न्यायमूर्तींचा शपथविधी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई - उच्च न्यायालयातील 14 अतिरिक्त नवनियुक्त न्यायमूर्तींचा शपथविधी सोमवारी (ता. 5) झाला. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा झाला. त्यानंतर लगेचच नव्या न्यायमूर्तींनी पदभार स्वीकारला. 

या नव्या नियुक्‍त्यांमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 75 झाली आहे. स्वातंत्र्यानंतर उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायमूर्ती एम. सी. चागला यांचे नातू रियाज चागला यांच्या शपथविधीसाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सरकारी न्यायसेवेतील पाच वकिलांसह आठ जिल्हा व सत्र न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आहे. यात राज्याचे महाधिवक्ता रोहित देव, ऍड. भारती डांगरे, ऍड. मनीष पितळे व पृथ्वीराज चव्हाण या चार नागपूरकर न्यायमूर्तींसह विभा कंकणवाडी आणि भारती डांगरे यांचाही समावेश आहे. सुनील कोटवाल, अरुण उपाध्याय, अरुण ढवळे, मुरलीधर गिरीटकर, सोपण गव्हाणकर व पथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. मंगेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक म्हणून कामकाज सांभाळले आहे. सरकारी वकील संदीप शिंदे यांचाही शपथविधी झाला. संबंधित न्यायमूर्तींची मुंबई, औरंगाबाद किंवा नागपूर येथे नियुक्ती होणार आहे.

Web Title: mumbai news high court