'मलबार हिलमध्ये असलेले अग्निशमन केंद्र हटवा'

mumbai high court
mumbai high court

मुंबई -  सिटीझन फोरमने मलबारहिल येथील प्रियदर्शिनी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राला विरोध केला होता. पण या विरोधाला डावलुन प्रियदर्शनी पार्कमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने खडसावले आहे, कारण "मुंबईत ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे प्रवाशाना त्रास होत असून, ह्यावर काही उपाय काढण्याऐवजी, पालिका प्रशासनाला फायर ब्रिगेडची पडली आहे?,'' अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.    पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले तात्पुरते अग्निशमन केंद्र ताबडतोब हटवण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

सकाळी अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश
प्रियदर्शनी पार्कमध्ये १९ जून २०१७ ला उभारण्यात आलेले अग्निशमन केंद्र हटवण्याचे निर्देश हायकोर्टाकडुन देण्यात आले होते.  तरी देखील अजुनही का हटण्यात आले नाहीत? असा प्रश्न करत हायकोर्टाने मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तात्पुरते अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश दिलेत.  बुधवारी मलबार हिल रहिवाशी संघटनेच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.

पालिकेकडुन का उभारण्यात आले अग्निशमन केंद्र?
प्रियदर्शनी पार्कचा भूखंड हा अग्निशमन केंद्रासाठी राखीव होता.  नियमानुसार 50 हजार लोकसंख्या असलेल्या विभागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणं आवश्यक आहे.  याआधी मलबार हिल परिसरात नाना चौकातून अग्निशमन सेवा पुरवली जायची.  मात्र ट्राफिकमुळे घटनास्थळी तात्काळ पोहचणं कठीण होत असल्यामुळे प्रियदर्शनी पार्क इथे एक छोटेखानी अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अग्निशमन केंद्राला सीटीजन फोरमचा का होता विरोध?
प्रियदर्शिनी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राला सीटीजन फोरमनी विरोध केला होता, कारण फायर ब्रिगेडमुळे प्रियदर्शनी पार्कमध्ये जॉगिंगला येणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याचे सांगत स्थानिक रहिवाशी संघटनेने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.  

अग्निशमन दलाच्या बंबाना पार्कमध्ये प्रवेश करता यावा याकरिता पार्कचे प्रवेशद्वार आणि पार्कमधील बरीच झाडे तोडण्यात आल्याचा आरोप रहिवाश्यानी केला. शिवाय या अग्निशमन केंद्रामुळे पार्कचे प्रवेशद्वार रात्रीच्या वेळेसही खुले ठेवावे लागतात.  परिणामी, कोणीही रात्रीच्या वेळेस पार्कमध्ये येतात आणि तेथील बाकडय़ांवर झोपतात त्यामुळे पार्कमध्ये स्वस्छता राहत नाही.  तात्पुरते अग्निशमन केंद्र हटवण्यात येणार असल्यामुळे रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

लढाई झिंकली पण युद्ध बाकी !

मुंबई हाय कोर्टच्या ऑर्डरनुसार प्रियदर्शनी पार्कमधून अग्निशमन बंब हा आज बाहेर काढण्यात आला! हे एक छोटेसे पण संघटित विजय आहे.  मलबार हिलच्या सर्व रहिवाश्यांसाठी, सदर समस्येला लढा देण्याकरिता, सोशल मीडियावर #SavePDP च्या माध्यमातून भरपूर जनजागृती आणि माहिती पुरवठे केले गेले.  change.org वर ऑनलाइन पेटिशन सुरु केले जिथे जवळ जवळ ३००० सह्या मिळवल्या.
'आपल्या मेहनतीचे थोडे यश रंगले, याबद्दल खूप बरं वाटलं.   आता घोडा मैदान लांब नाही.. न्याय हे आपले हक्कच आहे', असे दुर्गा शिंदे यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com