हिंदमाताजवळ लवकरच समांतर पर्जन्य जलवाहिनी? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - परळमधील हिंदमाता परिसरात पाणी तुंबू नये यासाठी महापालिका सध्याच्या पर्जन्य जलवाहिनीला समांतर नवी वाहिनी टाकण्याबाबत विचार करत आहे. 

या परिसरातील ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिनी काही वर्षांपूर्वी बदलण्यात आली. त्यानंतर रे रोड येथे उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशनही बांधण्यात आले. त्यानंतरही हिंदमाता, परळ टी. टी. परिसरात पाणी तुंबत आहे. 29 ऑगस्ट आणि त्यानंतर 19 सप्टेंबरच्या पावसातही येथील पाण्याचा निचरा झाला नव्हता. त्यामुळे महापालिका या जलवाहिनीला समांतर पर्जन्य जलवाहिनी टाकण्याच्या विचारात आहे. 

पालिकेने सुरुवातीला पर्जन्य जलवाहिनीचा व्यास वाढवण्याचा विचार केला होता; मात्र ही पर्जन्य जलवाहिनी जलवाहिनी, मलवाहिनी आणि इतर भूमिगत सुविधांच्या जवळ असल्याने तिचा व्यास वाढवता येणार नाही. त्यामुळे समांतर जलवाहिनी टाकण्याचा विचार सुरू आहे. हिंदमाताजवळील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबत उपाय सुचवण्यासाठी आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अहवालात सिंघल यांनी समांतर पर्जन्यवाहिनी टाकण्याचा पर्याय सुचवला आहे. 

परिसरात तीन रुग्णालये 
पूर्व उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या परिसरात केईम, वाडिया आणि टाटा ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. येथे पाणी तुंबल्यावर शहरातील किमान 30 टक्के वाहतुकीवर परिणाम होतो. 

काय आहे अडचणी? 
- 2005 च्या पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने नेमलेल्या चितळे समितीने हिंदमाता-परळ परिसरातील पावसाच्या पाण्याचा वरळी येथील पंपिंग स्टेशनमध्ये निचरा करण्याची शिफारस केली होती; मात्र रेल्वे रूळ ओलांडून पर्जन्यवाहिनी टाकणे शक्‍य नव्हते. त्यामुळे हे पाणी रे रोड येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाठवण्यात आले. 
- हिंदमातापासून ब्रिटानिया पंपिंग स्टेशन सुमारे 7.5 किलोमीटरवर आहे. हिंदमातापासून लालबाग, अभ्युदयनगर परिसरातील पाण्याचा निचरा एकाच जलवाहिनीतून होतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अपेक्षित वेगाने जात नाही. 
- हिंदमाता परिसर समुद्रसपाटीपेक्षा खाली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास विलंब होतो. एकाच जलवाहिनीवर ताण येत असल्याने अधिकच अडचणी येतात. 

Web Title: mumbai news hindmata