गृहकर्जावरील व्याजदर सवलतीला मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई - 2022पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना (एमआयजी) देण्यात येणाऱ्या व्याजदर सवलतीला मार्च 2018पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी दिला. राष्ट्रीय बांधकाम क्षेत्र विकास परिषदेतर्फे (एनएआरईडीसीओ) झालेल्या गृहनिर्माण आणि पायाभूत विकास गुंतवणूकदार परिषदेत गृहनिर्माण सचिव दुर्गाशंकर मित्रा यांनी ही माहिती दिली. 

या निर्णयामुळे 6 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना नऊ लाख रुपयांच्या कर्जावर 20 वर्षांसाठी व्याजात चार टक्के सवलत मिळेल. 12 ते 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना व्याजदरात तीन टक्के सवलत मिळेल. 2022 पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासगी गुंतवणूकदारांनी परवडणाऱ्या घरांसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहन मित्रा यांनी या वेळी केले. 

Web Title: mumbai news home loan NAREDCO