सर्वांना पगार द्या; पालिका आयुक्तांचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई - बायोमेट्रिकमुळे पगार रखडल्याने रुग्णालयांमध्ये झालेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या प्रकाराची दखल घेत कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विभागप्रमुखांना सुट्या आणि कामाच्या वेळा अपडेट करण्याबद्दल सुचविले आहे. 

बायोमेट्रिक यंत्रणेत असलेल्या दोषामुळे गोंधळ उडाला आहे. तेव्हा आवश्‍यक ते बदल यंत्रणेत करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. तोवर विभागप्रमुखांकडे असलेल्या नोंदीवरून कर्मचाऱ्यांचे कापलेले आणि थकलेले पगार देण्याच्या सूचना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत. तसेच संबंधित विभागाच्या प्रमुखांना पगार कापलेल्या, पगार न मिळालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती आणि त्यांच्या कामाचे तास यांची माहिती यंत्रणेला कळवावी. कर्मचाऱ्यांच्या सुट्या, त्यांच्या हजेरीच्या वेळा यांची माहिती कळवावी, असे या पत्रकात म्हटले आहे. यासाठी 31 मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. 

पालिका आयुक्तांनी सूचना दिल्या असल्या तरी पगार होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे कळते. 

Web Title: mumbai news hospital municipal commissioner