मुंबईत हॉटेलना 27 दिवसांत परवानगी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - हॉटेल आणि उपाहारगृह सुरू करण्याची परवानगी आता अवघ्या 27 दिवसांत मुंबई महापालिका देणार आहे. या सर्व परवानग्या ऑनलाइन मिळतील. पुढील टप्प्यात सर्वच व्यवसायांच्या परवानग्या ऑनलाइन "एक खिडकी' पद्धतीने मिळतील.

महापालिका हॉटेल आणि उपाहारगृहांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन एक खिडकी योजना सुरू करणार आहे. त्यासाठी कोठूनही अर्ज करता येईल. अर्जात त्रुटी असल्यास अर्जदाराला त्याची माहिती ई-मेल अथवा मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळेल. महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. उपाहारगृह किंवा हॉटेल सुरू करण्यासाठी आरोग्य, अनुज्ञापन, दुकाने व आस्थापने, अग्निशमन विभाग तसेच इतर विभागांची परवानगी घ्यावी लागत होती. आता ही परवानगी एकत्रच मिळेल.

Web Title: mumbai news hotel permission in 27 days