मारहाण करणाऱ्या पतीसोबत स्वाभिमानी स्त्री कशी राहील?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

पतीची घटस्फोटाविरुद्धची याचिका फेटाळली
मुंबई - दारू पिऊन पत्नीला मारहाण करणे ही हिंसाच आहे, अशा पतीबरोबर कोणतीही स्वाभिमानी स्त्री राहणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक दाव्यामध्ये नोंदवले आणि घटस्फोटाच्या निकालाविरोधातील पतीची याचिका नामंजूर केली.

पतीची घटस्फोटाविरुद्धची याचिका फेटाळली
मुंबई - दारू पिऊन पत्नीला मारहाण करणे ही हिंसाच आहे, अशा पतीबरोबर कोणतीही स्वाभिमानी स्त्री राहणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक दाव्यामध्ये नोंदवले आणि घटस्फोटाच्या निकालाविरोधातील पतीची याचिका नामंजूर केली.

नाशिकमध्ये राहणाऱ्या पतीने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेवर न्या. आर. एम. सावंत आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. सुमारे 15 वर्षांपूवी याचिकादाराचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. पत्नी सरकारी सेवेत असून, पतीचा खासगी व्यवसाय आहे. अनेकदा पतीने पत्नी आणि मुलांना मारहाण केली; तसेच दारू पिऊन पत्नी आणि मुलांना घराबाहेर काढण्याचे प्रकारही त्याने केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. तो दारू पिऊन मुलांच्या शाळेत गेल्याची तक्रारही पत्नीने केली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या मारहाणीला त्याच्या आई-वडिलांनीही न्यायालयात दुजोरा दिला आहे.

पती असे प्रकार करत असेल, तर कोणतीही स्वाभिमानी स्त्री त्याच्यासोबत राहण्यास तयार होणार नाही. त्यामुळे कुटुंब न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य निकषांवर आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. पतीने मुलांसाठी पाच लाख रुपयांचा निर्वाहभत्ता एकरकमी द्यावा. ही रक्कम मुलांच्या नावे कायमस्वरूपी ठेवींच्या स्वरूपात बॅंकेत जमा करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: mumbai news How will a self-respecting woman be with a bragging man?