पतीच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - नागपाडा येथे अकरा वर्षांपूर्वी झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यात एमआरए मार्ग पोलिसांना यश आले आहे. या व्यक्तीच्या पत्नीनेच त्याला मारण्यासाठी दोघांना दोन लाखांची सुपारी दिली होती, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह दोघा मारेकऱ्यांना अटक केली. 

मृताची पत्नी बन्सीबेन खारवा, फिरासतअली शहा आणि इरशादअली शहा अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 11 वर्षांपूर्वी नागपाडा परिसरात पुरुषाचे धड सापडले होते. मात्र त्याच्या शरीराचे इतर अवयव न सापडल्याने मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या पथकाने दोन मारेकऱ्यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी किसन खारवा याची हत्या केल्याची कबुली दिली. किसनला दारूचे व्यसन होते. त्यातून तो पत्नी बन्सीबेन हिला मानसिक व शारीरिक त्रास द्यायचा. त्यामुळे बन्सीबेन हिने फिरासतअली आणि इरशादअली यांना किसनच्या हत्येची सुपारी दिली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे. दोन्ही आरोपींना जे. जे. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Web Title: mumbai news husband murder case

टॅग्स