बेकायदा इमारतीवर शहाबाजमध्ये कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

नवी मुंबई - बेलापूरमधील शहाबाज गावातील ऐन पावसाळ्यात बेकायदा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर मंगळवारी (ता. २५) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ती जमीनदोस्त केली. महापालिका व सिडकोची परवानगी नसतानाही दोन मजली इमारतीचे काम सुरू होते.

प्रशांत जोशी व महेश कुंभार शहाबाज गावात महापालिकेच्या जागेवर इमारत बांधत होते. काही महिन्यांपासून हे काम सुरू होते. या बेकायदा बांधकामाला बेलापूर विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी एमआरटीपी कायद्यानुसार नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतरही हे काम सुरूच ठेवल्याने अतिक्रमण विरोधी विभागाच्या पथकाने त्यावर कारवाई केली. दोन डम्पर, पोकलेन आणि २० मजुरांच्या मदतीने ही इमारत जमीनदोस्त केली. या वेळी ९० हून अधिक पोलिस तैनात केले होते. ऐन पावसाळ्यात महापालिकेने केलेल्या या धडक कारवाईमुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: mumbai news illegal buildings encroachment