घणसोलीत बेकायदा पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

तुर्भे - कोपरखैरणे व घणसोली परिसरात वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिस विशिष्ट ठिकाणीच कारवाई करत असल्याने ती पक्षपाती होत असल्याचा आरोप होत आहे. बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यासाठी दिलेल्या टोइंग व्हॅनचाही गैरवापर केला जात आहे, असा आरोप भाजपचे वॉर्ड अध्यक्ष रवींद्र राजीवडे यांनी केला आहे.

कोपरखैरणेतील तीन टाकी ते डी मार्ट परिसरात बेकायदा पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष ठेवून वाहतूक सुरळीत ठेवणे गरजेचे आहे; परंतु ते येथील बेकायदा पार्किंगवर कारवाई करत नसल्याने या परिसरात नेहमीच वाहतुकीचा बोजवारा उडतो. घणसोली नोड व कोपरखैरणे परिसरातील रिक्षा स्टॅंड नियमबाह्य आहेत. ते बसचेही प्रवासी पळवतात.

Web Title: mumbai news illegal Parking traffic police