भारतीय बॉडी बिल्डिंगचा स्तर उंचावलाय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - भारतातील शरीरसौष्ठवचा (बॉडी बिल्डिंग) स्तर गेल्या काही वर्षांत खूप उंचावला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे येथील उत्तम दर्जाच्या व्यायामशाळा होय. भारतातील काही व्यायामशाळा या अमेरिकेतील व्यायामशाळांपेक्षाही सरस आहेत. त्यामुळे भविष्यात भारतीय बॉडी बिल्डिंगला खूप चांगले दिवस येतील, यात शंका नसल्याचे मत जागतिक शरीरसौष्ठवपटू काई ग्रीन याने व्यक्त केले. 

मुंबईतील महालक्ष्मी येथील ‘नायट्रो बेस्पोक’ फिटनेस जिमला त्याने नुकतीच भेट दिली. त्यावेळी तो बोलत होता. कोणत्याही देशातील बॉडी बिल्डिंगमधली प्रगती ही तेथील व्यायामशाळांवर अवलंबून असते. भारतात बॉडी बिल्डिंग क्षेत्रात प्रगती झाली आहे. त्याचे उत्तर मला येथील व्यायामशाळा पाहिल्यानंतर मिळाले. २० हजार चौरस फुटांत पसरलेली ‘नायट्रो’ ही अत्याधुनिक व्यायामशाळा पाहून ग्रीनही म्हणाला की, अशा व्यायामशाळा अमेरिकेतही नाहीत. या वेळी ‘नायट्रो’ जिमचे मालक प्रबोध डावखरे यांनी अमेरिकेतही अशा व्यायामशाळा उघडाव्यात, अशी विनंती  केली.  फिटनेसबाबत अमेरिकेतही खूप जागरूकता झाली आहे. त्यामुळे अगदी कमी वयापासून येथील तरुण-तरुणी व्यायामशाळेत जातात. भारतातही तसेच चित्र दिसत असल्याचे ग्रीन म्हणाला. ग्रीनने नुकतीच ठाणे व मुंबईला भेट दिली होती. काई ग्रेन याने २०१६ मध्ये अरनॉल्ड क्‍लासिक ही शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती. याशिवाय मिस्टर ऑलंपिया या जगातील सर्वात मोठ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत २०१२, २०१३ व २०१४ मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता.

Web Title: mumbai news Indian bodybuilding