ऑस्कर नामांकनात भारतीय ‘कनेक्‍शन’

पीटीआय
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेता अली फजल यांनी अभिनय केलेले दोन इंग्रजी चित्रपट या वर्षी ऑस्करच्या शर्यतीत आहेत. अनुपम खेर यांची भूमिका असलेला ‘द बिग सिक’ आणि अली फजल याची भूमिका असलेला ‘व्हिक्‍टोरिया ॲण्ड अब्दुल’ या चित्रपटांना ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. ‘द बिग सिक’ या चित्रपटाला मूळ पटकथालेखनाचे नामांकन मिळाले. ‘व्हिक्‍टोरिया ॲण्ड अब्दुल’ या चित्रपटाला वेशभूषा आणि रंगभूषा व केशभूषा अशी दोन नामांकने मिळाली आहेत. 

सर्वाधिक ऑस्कर नामांकने 
 सर्वाधिक १३ नामांकने ‘द शेप ऑफ वॉटर 
 युद्धचित्रपट ‘डनकर्क’ला आठ नामांकने 
    ‘थ्री बिलबोर्डस आइटसाइड एबिंग, मिसौरी’ला सात नामांकने 

उत्कृष्ट चित्रपट 
    कॉल मी बाय यूअर नेम 
    डार्केस्ट आवर 
    गेट आउट 
    लेडी बर्ड 
    फॅंटम थ्रेड 
    द पोस्ट 
    द शेप ऑफ वॉटर 
    थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग, मिसौरी 
    डंकर्क

उत्कृष्ट अभिनेता 
    टिमोथी शॅलामेट        डॅनियल डे लेविस 
    डॅनियल कालुया        गॅरी ओल्डमन 
    डेन्झेल वॉशिंग्टन 

उत्कृष्ट अभिनेत्री 
    सॅली हॉकिन्स        फ्रान्सेस मॅकडॉरमंड 
    मॅरगॉट रॉबी         साओर्स रोनॅन 
    मेरील स्ट्रीप

उत्कृष्ट दिग्दर्शक 
    ख्रिस्तोफर नोलन (डनकर्क) 
    जॉर्डन पील (गेट आऊट) 
    ग्रेटा ग्रेविग (लेडी बर्ड) 
    पॉल थॉमस अँडरसन (फॅंटम थ्रेड) 
    गिलर्मो डेल टोरो 
    (द शेप ऑफ वॉटर) 

‘द बिग सिक’ या चित्रपटाला उत्कृष्ट मूळ पटकथेचे नामांकन मिळाल्याबद्दल पटकथालेखक एमिली व्ही. गॉर्डन आणि कुमैल नानजियानी यांचे अभिनंदन. या चांगल्या चित्रपटाचा हिस्सा ठरल्याबद्दल मी अभिमानी आहे. 
- अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते 

‘व्हिक्‍टोरिया ॲण्ड अब्दुल’ चित्रपटाला दोन नामांकने मिळाली असून, ही अतिशय सन्मानाची बाब आहे. नामांकने मिळालेल्या सर्वांचेच अभिनंदन आणि शुभेच्छा! 
- अली फजल, अभिनेता

Web Title: mumbai news indian connection in oscar nomination