प्रोजेक्ट 75 नुसार तिसरी स्कॉर्पिओ प्रजातीची पाणबुडी माझगाव डॉककडून नौदलाकडे

प्रोजेक्ट 75 नुसार तिसरी स्कॉर्पिओ प्रजातीची पाणबुडी माझगाव डॉककडून नौदलाकडे

मुंबई, ता. 15 : नौदलाच्या प्रोजेक्ट 75 नुसार बांधण्यात आलेली स्कॉर्पिओ वर्गाची तिसरी पाणबुडी करंजा आज माझगाव गोदीतून नौदलाच्या ताब्यात देण्यात आली. स्कॉर्पिओ वर्गाच्या पाणबुड्या या मूळ फ्रेंच बनावटीच्या आहेत. 

आज यासंदर्भातील औपचारिक कागदपत्रांवर माझगाव डॉकच्या तसेच नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आता यथावकाश समुद्री चाचण्या घेतल्यानंतर ही पाणबुडी अधिकृतपणे नौदल ताफ्यात समाविष्ट होईल. यापूर्वी माझगाव डॉकमध्ये या प्रकारच्या खांदेरी व कलवरी या दोन पाणबुड्यांची बांधणी करण्यात आली आहे.

या पाणबुड्यांमध्ये प्राणवायू निर्मितीची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे या प्रकारच्या पाणबुड्या इतर पाणबुड्यांपेक्षा पाण्याखाली जास्त वेळ राहू शकतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे शत्रूला कठीण होते. 

या प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती माझगाव डॉकमध्ये करण्यात येईल. मे 2019 मध्ये जलावतरण झालेली चौथी पाणबुडी वेला हिच्या समुद्री चाचण्या सुरु आहेत. तर नोव्हेंबर 2020 मध्ये जलावतरण झालेली पाचवी पाणबुडी वागीर हिच्या बंदरातील चाचण्यात सुरु आहेत.

सहाव्या पाणबुडीची निर्मिती सुरु आहे. यापूर्वी माझगाव डॉकमध्ये 1992 व 1994 मध्ये जर्मन बनावटीच्या एसएसके प्रकारच्या (पाणबुडीविरोधी) दोन पाणबुड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या अजूनही नौदलाच्या सेवेत आहेत. अशा प्रकारच्या चारही पाणबुड्यांची मोठी दुरुस्ती व सुधारणांचे कामही माझगाव डॉकमध्ये करण्यात आले.

यापूर्वी माझगाव डॉकमध्ये लिअँडर व गोदावरी वर्गातील फ्रिगेट, कुकरी वर्गाच्या कॉरव्हेट, दिल्ली वर्गाच्या विनाशिका तसेच रडारवर न दिसणाऱ्या शिवालिक वर्गाच्या स्टेल्थ युद्धनौका बांधण्यात आल्या होत्या.

mumbai news Indian navy project 75 third scorpion submarine handed over to navy by mazgaon dock

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com