इंद्राणी, पीटर यांना वाहनचालकाने ओळखले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील माफीचा साक्षीदार बनलेल्या वाहनचालक श्‍यामवर राय याने इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांना न्यायालयात ओळखले. या हत्याकांडातील त्याची महत्त्वाची साक्ष मंगळवारी पूर्ण झाली.

शीनाची हत्या 2012 मध्ये झाली होती. ही हत्या इंद्राणी मुखर्जीने आधीचा पती संजीव खन्ना याच्या मदतीने केली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेल्या पीटर मुखर्जी तसेच इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्नाला श्‍यामवर याने ओळखत हत्येच्या दिवशीचे संपूर्ण कथानक न्यायालयात साक्षीदरम्यान सांगितले. न्यायालयात हे तिघे उपस्थित आहेत का, असे विचारताच प्रत्येकाकडे बोट दाखवत श्‍यामवर याने तिघांना ओळखले.

इतक्‍या दिवसांत न्यायालयात उपस्थित राहून केवळ सुनावणी ऐकणाऱ्या श्‍यामवरने पहिल्यांदाच या तिघांकडे थेट पाहत त्यांची ओळख करून दिली. शीनाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणाची माहिती तसेच शीनाचा भाऊ मिखाईलची हत्या करण्याचा फसलेला प्रयत्न याची माहितीही त्याने साक्षीच्या वेळी दिली.

Web Title: mumbai news indrani & peter identify by driver