'तेजस'वर सूचनांचा भडिमार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई - मुंबईहून कोकणात सुपरफास्ट प्रवासासाठी सीएसटी ते करमाळी ही तेजस एक्‍स्प्रेस 22 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वेगाडी म्हणजे आरामदायी प्रवास असे सांगण्यात येत असले, तरी रेल्वेच्या तक्रार अर्जांत खाद्य पदार्थ, मनोरंजनाबरोबरच गाडीची वेळ बदलण्यासह अन्य सूचनांचा पाऊस पडला आहे. काही प्रवाशांनी या गाडीतील सुविधा उत्तम असल्याचे मत नोंदविले आहे.

प्रवाशांच्या सूचना खाद्य पदार्थ
- सुधारणा करण्याची आवश्‍यकता. स्थानिक पदार्थांचा समावेश करा.
- उपाहारापूर्वी अतिरिक्‍त चहा किंवा कॉफी द्यावी. चहा किंवा कॉफी वेंडिंग मशिन बसवा.
- स्वच्छतेत सुधारणा हवी.
- पॅन्ट्रीचा डबा जोडण्यात यावा.

स्वच्छता
- गाडीचे डबे आणि प्रसाधनगृह स्वच्छ केले पाहिजे.

मनोरंजन
- एलईडी टीव्हीवर अधिक चित्रपट आणि गाणी दाखवावीत
- प्रत्येक प्रवाशाला नवीन हेडफोन द्यावेत. गरज असल्यास शुल्क आकारावे.

अन्य
- तेजस गाडी सीएसटीतून पहाटे साडेपाच वाजता सुटते. प्रवाशांसाठी वेळ बदलणे आवश्‍यक.
- प्रत्येक थांबा हा किमान पाच मिनिटांचा असावा.
- डब्यातील एसीचे तापमान योग्य राहण्यासाठी व एसी हाताळण्यासाठी नियंत्रक नेमावा.

या गाडीचे दरवाजे हे स्वयंचलित आहेत. त्याची हाताळणी गार्डकडून केली जाते. मात्र त्याचे दरवाजे नेमक्‍या किती वेळात बंद होणार याचा अंदाज प्रवाशांना येत नाही. त्यामुळे गाडीमध्ये सामानासह चढताना किंवा उतरताना प्रवाशांची धांदल उडते. हे पाहता स्वयंचलित दरवाजाजवळ दरवाजा किती वेळात बंद होणार अशी वेळ दाखवणारी यंत्रणा बसवण्यावर विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: mumbai news information on tejas express