अपत्यप्राप्तीच्या उपचारासाठी विमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - अपत्य होण्यात येणाऱ्या समस्यांमुळे देशातील तीन कोटी महिला त्रस्त आहेत. या महिलांना अपत्य होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारांवर मोठा खर्च करावा लागतो. या उपचारांसाठी विम्याचे कवच नसल्याने शहरी व ग्रामीण भागातील महिलांची फरपट होते. ही फरपट टाळण्यासाठी अपत्यप्राप्तीसाठी आवश्‍यक उपचारांकरिता विम्याचे कवच आवश्‍यक असल्याचे मत इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्‍शनच्या अध्यक्ष डॉ. दुरू शहा यांनी व्यक्त केले. ही बाब लक्षात घेत भारतातील महिला बॅंक व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने महिलांसाठी दिलेल्या विम्यामध्ये या उपचारांचा समावेश केला आहे. 

महिलांना अपत्य होण्यात येणाऱ्या  समस्यांचे प्रमाण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यांना शहरात येऊन उपचाराचा खर्च करणे परवडत नाही. शहरी भागातील महिलांनाही अनेकदा उपचारासाठी कामावर अनुपस्थित राहावे लागते. अपत्यप्राप्तीसाठी होणारे उपचार महागडे असल्याने अनेकांना ते परवडणारे नसल्याने त्यांची फरपट होते. अपत्यप्राप्तीसाठी महिला अनेकदा बाबा, बुवा आणि चुकीच्या उपचारांकडे वळतात. त्यामुळे महिलांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी विम्याचे कवच आवश्‍यक असल्याचे शहा यांचे म्हणणे आहे. 

मूल न होणे या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने अपत्यप्राप्तीच्या उपचारांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता असल्याचे डॉ. दुरू यांचे म्हणणे आहे.

अनेक देशांत विम्यामध्ये समावेश
अमेरिकेत १२ राज्यांमध्ये डेन्मार्क आणि फिनलॅण्डमध्ये आंशिक कव्हरेज आहे; तर बेल्जियम, फ्रान्स, नेदरलॅण्ड आणि स्वीडनमध्ये सर्व नियमांवर पात्र ठरणाऱ्या रुग्णांचा पूर्ण खर्च विम्यामार्फत करण्यात येतो.

Web Title: mumbai news Insurance childhood

टॅग्स