इरफान खानला दुर्मिळ कर्करोग

पीटीआय
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - अभिनेता इरफान खान याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा आजार झाल्याचे निदान झाले असून यावरील उपचारासाठी तो विदेशात गेला आहे. त्याने स्वत: प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.

मुंबई - अभिनेता इरफान खान याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा आजार झाल्याचे निदान झाले असून यावरील उपचारासाठी तो विदेशात गेला आहे. त्याने स्वत: प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार असून तो शरीराच्या विविध भागांमध्ये पसरतो. "या आजाराबरोबर लढणे अवघड जात असले तरी माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला बळ दिले आहे. त्यामुळे या आजाराविरोधात लढण्याची आशा माझ्यात निर्माण झाली आहे,' असे इरफान याने म्हटले आहे. आपल्याला शुभेच्छांची आवश्‍यकता असल्याने चाहत्यांनी सातत्याने लढण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात, असे भावनिक आवाहनही इरफानने केले आहे. "माझ्या आजाराबाबत उठलेल्या अफवांकडे लक्ष न देता मी सांगण्याची वाट पाहिल्याबद्दल चाहत्यांचे आभार. मी लवकरच परत येईन,' असे इरफानने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: mumbai news irrfan khan cancer