इरफान खान दुर्मिळ "न्युरो एन्डॉक्रिन ट्युमर'ने ग्रस्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

या प्रकरणी उठत असलेल्या अफवांच्या पार्श्‍वभूमीवर न्युरो म्हणजे कायमच मेंदुचा आजार नसतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर आता या आजाराविषयी "गूगल'वर माहिती शोधणे हा देखील संशोधनाचा सर्वांत सोपा मार्ग नाही! माझ्या या शब्दांची प्रतीक्षा केलेल्यांना लवकरच मी अधिक माहिती देऊ शकेन, अशी मला आशा आहे

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याला "न्युरो एन्डॉक्रिन ट्युमर' हा दुर्मिळ आजार झाल्याचे आज (शुक्रवार) स्पष्ट झाले. इरफान याने स्वत: ट्‌विटरच्या माध्यमामधून ही माहिती दिली. इरफान एका दुर्धर रोगाने ग्रस्त झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. या पार्श्‍वभूमीवर त्याने या आजाराबद्दल माहिती देण्याचे आश्‍वासन दिले होते.

"न्युरो एन्डॉक्रिन ट्युमर हा आजार जडल्याचे मान्य करणे मला अवघड जात आहे. या आजारावरील उपचारासाठी मी परदेशी जात आहे. मला शुभेच्छा पाठविणाऱ्यांनी त्या तशाच पाठवाव्यात अशी माझी विनंती आहे. या प्रकरणी उठत असलेल्या अफवांच्या पार्श्‍वभूमीवर न्युरो म्हणजे कायमच मेंदुचा आजार नसतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर आता या आजाराविषयी "गूगल'वर माहिती शोधणे हा देखील संशोधनाचा सर्वांत सोपा मार्ग नाही! माझ्या या शब्दांची प्रतीक्षा केलेल्यांना लवकरच मी अधिक माहिती देऊ शकेन, अशी मला आशा आहे,'' असे इरफान याने म्हटले आहे.

Web Title: mumbai news Irrfan Khan neuroendocrine tumour