आयआयटीच्या विद्यार्थ्याची ऑनलाइन फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - ऑनलाइन शॉपिंगवर "फ्री गिफ्ट'ची ऑफर देऊन पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याची 30 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई - ऑनलाइन शॉपिंगवर "फ्री गिफ्ट'ची ऑफर देऊन पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याची 30 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा विद्यार्थी ऑनलाइन खरेदी करत असताना संकेतस्थळावर तीन हजार रुपयांहून अधिक खरेदी केल्यास फ्रीज, लॅपटॉप भेट मिळेल, अशी ऑफर होती. विद्यार्थ्याने 26 मे रोजी साडेतीन हजार रुपयांची खरेदी केली आणि फ्री गिफ्ट म्हणून लॅपटॉप निवडला. त्याच दिवशी या विद्यार्थ्याला संकेतस्थळाकडून दूरध्वनी आला. दूरध्वनीवरील व्यक्तीने त्याला 50 हजार रुपयांचा लॅपटॉप गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे आणि त्याच्या करापोटी एका पेटीएम खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. त्याने ते भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा लॅपटॉपच्या विम्यापोटी आणखी काही रक्कम त्याला भरण्यास सांगण्यात आले. त्याने तीही रक्कम भरली.

काही दिवसांनी संकेतस्थळाकडून त्याला पुन्हा दूरध्वनी आला. "गिफ्ट म्हणून पाठवलेला लॅपटॉप वाटेत खराब झाल्याने विम्याचे एक लाख तुम्हाला लवकरच मिळतील; परंतु त्यासाठी तुम्हाला 15 हजार रुपये भरावे लागतील, असे दूरध्वनीवरील व्यक्तीने विद्यार्थ्यास सांगितले. विद्यार्थ्याने तीही रक्कम भरली. त्याला विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे त्याने चौकशीसाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Web Title: mumbai news iti student online cheating