'एसटी'वर "जय महाराष्ट्र'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

मुंबई - "जय महाराष्ट्र' अशी घोषणा देणाऱ्या सीमाभागातील लोकप्रतिनिधींची पदे रद्द करण्यात येतील, अशी घोषणा कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या पार्श्‍वभूमीवर परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी बसवर लवकरच "जय महाराष्ट्र' नमूद केले जाईल, अशी घोषणा केली. एसटीच्या 69 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रावते यांनी "जय महाराष्ट्र', असे नमूद असलेल्या लोगोचे अनावरण करत या घोषणेची अंमलबजावणी केली. हा लोगो असलेली पहिली बस उद्या (शुक्रवारी) सकाळी 7.30 वाजता मुंबई सेंट्रल आगारातून बेळगावसाठी रवाना होणार आहे.
Web Title: mumbai news jai maharashtra on st