प्रभा अत्रे यांना जीवनगौरव पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मुंबई - आदित्य बिर्ला यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव व कलाशिखर पुरस्काराने किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना गौरविण्यात येणार आहे. येत्या 11 नोव्हेंबरला मुंबई होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

आदित्य विक्रम बिर्ला यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी संगीत कला केंद्राकडून ललित कलांमध्ये उत्कृष्ट कामगिरीला सलाम करण्यासाठी पुरस्कार दिले जातात. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या कलाकाराला मानाचा मुजरा करण्यासाठी प्रथम पुरस्कार प्रदान केला जातो, तर शिखरावर पोचण्याची क्षमता असणाऱ्या तरुण कलाकारांना द्वितीय पुरस्कार दिला जातो.

यंदा केंद्राच्या अध्यक्ष राजश्री बिर्ला व सचिव ललित बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली संगीत कला केंद्राने हिंदुस्तानी शास्त्रीय गायन क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. प्रभा अत्रे यांची निवड केली, तर अनोल चॅटर्जी व श्रीमती सावनी शेंडे-साठ्ये यांना द्वितीय क्रमांकाच्या आदित्य विक्रम बिर्ला कलाकिरण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news jeevangaurav award to prabha atre