जिया खान आत्महत्या खटल्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई - अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येशी संबंधित खटल्याचे कामकाज बुधवार (ता. 14) पासून विशेष न्यायालयात सुरू झाले आहे. अभियोग पक्षाला साक्षीदारांची यादी दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई - अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येशी संबंधित खटल्याचे कामकाज बुधवार (ता. 14) पासून विशेष न्यायालयात सुरू झाले आहे. अभियोग पक्षाला साक्षीदारांची यादी दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

जियाने पाच वर्षांपूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणातील आरोपी अभिनेता सूरज पांचोलीविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. बुधवारी अभियोग पक्षाच्या साक्षीदारांची यादी दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. सूरजने आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. जियाचे आणि त्याचे प्रेमसंबंध होते आणि त्यातील तणावातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला आहे. खटल्याची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार आहे.

Web Title: mumbai news jiah khan case work start