जोगेश्वरीत बेकरीची चिमणी कोसळल्याने तिघांचा मृत्यू, 2 जखमी

टीम ई सकाळ
रविवार, 23 जुलै 2017

सहआयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले, "मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्ती बेकरीमध्ये काम करत होत्या. बेकरीचे बांधकाम जुने आहे."

मुंबई : जोगेश्वरी येथील एका बेकरीची चिमणी कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला, तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. एस.व्ही. रोडवरील अक्सा बेकरीत शनिवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

मृतांमध्ये किस्मत अन्सारी (वय 22), जितेंद्र अन्सारी (वय 21) यांचा समावेश असून, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर तेजी बर्गे यांचा पहाटे साडेचार वाजता उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 

जखमींना कपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. राजू भारद्वाज (वय 26) यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर हाजिमुल्ला (वय 48) यांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. जोगेश्वरी एस.व्ही. रोडवर फैजान अपार्टमेंटबाहेरील अकसा बेकरीतील या दुर्घटनेबद्दल बृहन्मुंबई महापालिकेचे सहआयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले, "मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्ती बेकरीमध्ये काम करत होत्या. बेकरीचे बांधकाम जुने आहे. घटना घडली तेव्हा हे मजूर स्वयंपाक करत होते."

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
संगमनेर: २५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त; वाळू तस्करांमध्ये खळबळ 
अयोध्येत राममंदिर कायदेशीर मार्गानेच: अमित शहा
खासगी, सरकारी जमिनीवर वनाच्छादन वाढविणार
शिवाजीराव पाटील यांचे निधन
शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीने मदतीचे वाटप
थेट चर्चेद्वारा तणाव कमी करा; भारत आणि चीनला पेंटॅगॉनचा सल्ला
काँग्रेस एकत्र आल्या, तर मोदी लाट रोखणे शक्‍य - पृथ्वीराज चव्हाण
...तर शाहबाज घेणार शरीफ यांची जागा
अमेरिकेच्या हल्ल्यात 16 पोलिस कर्मचारी ठार
सद्यःस्थितीमुळे 'पाक'ला मदत नाकारली: जीम मॅटीस

Web Title: mumbai news jogeshwari aqsa bakery accident three dead