KDMT'चे उपन्न घटले; 3 दिवस पाऊस, कामगारांच्या दांड्यांमुळे फटका?

रविंद्र खरात 
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

रेकॉर्ड ब्रेक पाऊस...
कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील 24 तासात 108 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून मागील वर्षी वर्षी 1 जून 2016 ते 31 ऑक्टोबर 2016 या कालावधित 2454.60 मिमी पाऊस पडला , तोच 1जून 2016 ते 28 ऑगस्ट 2016 या कालावधीत 2354.85 मिमी पाऊस पडला होता , मागील वर्षी पेक्षा या वर्षी 1 जून 2017 ते 28 ऑगस्ट 2017 कालावधीत 2773 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे , सरासरी पाहता मागील वर्षी पेक्षा यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला असून पुढील काही महीने पाउसाचे बाकी असल्याने रेकॉर्ड ब्रेक पाउस होणार असल्याचे चिन्ह आहेत.

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरी ग्रामीण भागात पड़त असलेल्या मुसळधार पावसाने केडीएमटी बस उपक्रमाला चांगलाच फटका बसला असून त्यात गणेशोत्सवाच्या काळात आलेल्या सुट्टी आणि कर्मचारी वर्गाने दांडी मारल्याने केडीएमटीचे उपन्न मागील 3 दिवसात प्रति दिन दीड लाख रुपये घटले असून दिवसेदिवस केडीएमटीचे चाक डबघाईच्या चिखलात रूतत चालले आहे . 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या केडीएमटी उपक्रम दिवसेदिवस डबघाईला जात असून ते बाहेर काढण्याचे प्रयन्त परिवहन समिती सभापती संजय पावशे आणि सर्व पक्षीय परिवहन समिती सदस्य , महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांची टीम करत असून त्यांना वारंवार पालिका आयुक्त पी वेलरासु ही मार्गदर्शन करत असून त्यानुसार उपन्न वाढीसाठी बसेस रस्त्यावर धावत आहेत . जेथे 7 लाख रुपये  प्रति दिन मिळत होते ते साडे पाच ते सहा लाख झाले ते वाढ व्हावी , प्रवासी संख्या जास्त आहे तेथे जास्त आहे तेथे बसेस वाढवा ये प्रयन्त सुरु असताना ऐन गणेशोसत्व काळात केडीएमटीला चांगलाच फटका बसला आहे . शुक्रवार ता 25 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरु झाला या कालावधीत लागोपाठ सरकारी सुट्टी आली , याच कालावधीत मुसळधार पाऊस आणि कर्मचारी वर्गाने दांडी मारल्याने जे साडे पाच लाख उपन्न येत होते ते केवळ साडे तीन लाख उपन्न शुक्रवार , शनिवार आणि रविवारी मिळाले यामुळे प्रति दिन दीड लाखांचे उपन्न घटले असल्याचे समोर आले आहे , यामुळे केडीएमटीचे चाक दिवसेंदिवस डबघाईच्या गाळात रुतत चालला आहे . यावर प्रशासन क़ाय उपाय योजना क़ाय करणार याकडे लक्ष्य लागले आहे . 

मागील 3 दिवस सुट्टी आणि पड़त असलेल्या मुसळधार पाऊस आणि कर्मचारी वर्गाने बिना परवानगी मारलेली दांडी यामुळे मागील 3 दिवस प्रतिदिन दीड लाखांचे उपन्न घटले आहे ,विना परवानगी दांडी मारणे , पूर्ण दिवस काम न करणे याबाबत अधिकारी वर्गाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून दोषी कर्मचारी वर्गावर कारवाई बाबत आयुक्ताकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यांच्या आदेश नुसार कारवाई करू अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली.

Web Title: mumbai news kalyan dombivali KDMT bus transport