तब्बल 18 वर्षांनी चार कर्मचारी KDMTच्या स्थायी सेवेत!

बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

महापालिका कामगार कर्मचारी संघटनाने केला जल्लोष

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या 4 कर्मचाऱ्यांना तब्बल 18 वर्षांनी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र दिल्याने बुधवारी (ता. 15) महापालिका कर्मचारी संघटनेने जल्लोष साजरी केला. यावेळी नगरसेवक आणि संघटना अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.  

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम सन 1999 मध्ये सुरू झाला. या उपक्रमात सध्या 500 हून अधिक कर्मचारी अधिकारी काम करत आहेत. शेकडो वाहक चालकांना सेवेत घेतल्यावर स्थायी कर्मचारी नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनामधील अधिकारी आणि संघटनेमधील अंतर्गत वादामुळे ह्या नियुक्त्या न झाल्याने शेकडो कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत.

वाहक चालकांना परिवहन उपक्रमात स्थायी कर्मचारी म्हणून नेमणूक करावी म्हणून मागील वर्षापासून महापालिका कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष आणि नगरसेवक महेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल पंडित, सुधीर पंडित, सुनिल शितकर आदींनी केडीएमटी प्रशासन सोबत मिटींग आणि पाठपुरावा केला, त्याला आज यश आले, बुधवार ता 15 नोव्हेंबर रोजी कमलाकर गोसावी ( वाहक ) सहीत 3 कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्त पत्र दिल्याने संघटना पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरी केला. यावेळी अध्यक्ष आणि नगरसेवक महेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल पंडीत, परिवहन समिती सदस्य संजय राणे यांच्या उपस्थित स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले तर कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून एकमेकांचे अभिनंदन केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news kalyan dombivali KDMT bus transport