पाऊस, खड्डेमय रस्ते, जागोजागी वाहतूक कोंडी... 'KDMT'च्या 103 फेऱ्या रद्द !

रविंद्र खरात 
बुधवार, 19 जुलै 2017

60 हजार  रूपयांचा फटका... दुष्काळात तेरावा महिना...

केडीएमटीच्या कार्यशाळेमधून बसेस वेळेवर न मिळाल्याने 25 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पाऊस आणि शहारतील वाहतूक कोंडीमुळे वाहक आणि चालक उशिरा पोचले. यामुळे 22 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. वाहतूक कोंडीमुळे 13 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर रस्त्यात खड्डे आणि पावसात बसेस ब्रेकडाऊन झाल्याने 43 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे उपन्नामध्ये चांगलाच फटका बसला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाची उपन्न वाढी साठी धडपड सुरू असताना मंगळवार (ता. 18 जुलै) पडलेल्या पावसामुळे केडीएमटीच्या बसेसच्या 103 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे सुमारे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. त्याला कारण म्हणजे कल्याण डोंबिवलीसह अन्य शहरांत पावसाने रस्त्यात पडलेले खड्डे आणि त्यामुळे होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी वर्गाने पाठ फिरविल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत केडीएमटी उपक्रमाची झाली आहे. 

कल्याण आणि डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील 24 तासात 149 मि . मि पाऊसाची नोंद झाली असून  तर 1 जून ते आज बुधवार ता 19 जुलै सकाळी 7 वाजे पर्यंत 1605 मिमी पाऊस पडला आहे. सलग तीन-चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवलीसह आजुबाजूच्या शहरात रस्त्यात पडलेल्या खड्यामुळे जागोजागी वाहतुक कोंडी झाली होती. त्याचा फटका कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाला बसला आहे .

सोमवार (17 जुलै) केडीएमटी उपक्रमाला 5 लाख 84 हजार 178 रुपयांचे उपन्न मिळाले तेच मंगळवार ता 18 जुलै रोजी सकाळच्या सत्रांत 76 तर दुपारच्या सत्रात 70 बसेस रस्त्यावर धावल्या मात्र मुसळधार पाऊस आणि रस्त्यात खड्डे आणि त्यामुळे झालेली वाहतुक कोंडी यामुळे प्रवासी वर्गाने केडीएमटी बस कड़े पाठ फिरवली यामुळे त्या दिवशी 60 हजार रुपयाने घटले , दिवसागणिक सुमारे 5 लाख 16 हजार 161 रुपयांचे उपन्न मिळाले .कल्याण पनवेल ,  कल्याण वाशी आणि कल्याण बेलापुर हे उपन्नाचे मार्ग असून शिळफाटा रोड , कल्याण पूर्व हाजीमलंग रोड कल्याण पश्चिम मुरबाड रोड , वालधुनी पुल , शहाड पुल , डोंबिवली , भिंवड़ी रोड ,नवी मुंबई आणि पनवेल रोड वर ही अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडल्याने त्या परिसर मध्ये मंगळवार ता 18 जुलै रोजी संथ गतीने वाहनाची वर्दळ सुरु होती तर अनेक ठिकाणी वाहतुक कोंडीचा फटका केडीएमटी उपक्रमाला बसला . 

पावसाचा फटका... आणि 103 फेऱ्या रद्द...
मंगळवार ता 18 जुलै रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली केडीएमटी उपक्रम च्या बसेस च्या 103 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, यात केडीएमटीच्या कार्यशाळेमधून बसेस वेळेवर न मिळाल्याने 25 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पाऊस आणि शहारतील वाहतूक कोंडीमुळे वाहक आणि चालक उशिरा पोचले. यामुळे 22 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. वाहतूक कोंडीमुळे 13 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर रस्त्यात खड्डे आणि पावसात बसेस ब्रेकडाऊन झाल्याने 43 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे उपन्नामध्ये चांगलाच फटका बसला आहे.

दुष्काळात तेरावा महिना...
केडीएमटी प्रशासनावर टीका झाल्यावर उपन्न वाढीसाठी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्या पथकाने कंबर कसली असून, काही दिवस उपन्नही वाढले. मात्र पावसाने रस्त्यात पडलेल्या खड्याने उपन्नही घसरले जात असून, दुष्काळात तेरावा महिना अशी गत केडीएमटी उपक्रमाची झाली असून, महिन्याची 20 तारीख आली तरी अधिकारी कर्मचारी वर्गाचा पगार न झाल्याने काम कसे करायचे असा प्रश्न केडीएमटी अधिकारी कर्मचारी वर्गासमोर निर्माण झाला आहे .

उपन्नवाढीसाठी केडीएमटी प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरवात केली असून त्याचा परिणाम उपन्नही वाढले. मात्र मंगळवारी पडलेल्या मुसळधार पाऊस आणि कल्याण डोंबिवलीसह वाशी, बेलापूर, भिवंडी मार्गावर रस्त्यात खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे उपन्नात फटका बसला आहे. यातून पर्याय काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याची माहिती कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रम महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली. 

Web Title: mumbai news kalyan dombivali KDMT bus trips cancelled