केडीएमटी कारभाराची महापौर देवळेकर घेणार झाडाझडती

रविंद्र खरात
मंगळवार, 20 जून 2017

सत्तेत आल्यावर अनेक ठिकाणी परिवहन बसेस सोडू अशी आश्वासन नागरिकांना दिली होती. काही ठिकाणी सुरु झाली तर काही ठिकाणी बसेस पोहचल्या नाही, नेमकी उपन्न का घटते, उपन्न वाढसाठी काय करावे, कुठे केडीएमटीच्या बसेस अडकतात यावर आढावा बैठक घेवून तोड़गा काढू, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून दर महिन्याला 1 कोटी पेक्षा जास्त अनुदान कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमास देवूनही नागरिकांना सुविधा मिळत नसून कर्मचारी वर्गाचे ही पगार वेळेवर होत नसल्याने नाराजी पसरली आहे, त्यामुळे परिवहन उपक्रमाची झाड़ाझड़ती महापौर राजेंद्र देवळेकर बुधवार (21 जून) रोजी घेणार आहेत. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपक्रमाला केंद्र आणि राज्य शासन पासून कोटयावधी रूपयांचा निधी प्राप्त झाल्याने त्यांच्या ताप्यात शेकडो बसेस आल्या , मात्र त्या रस्त्यावर धावण्या अगोदर खराब झाल्या, वेळेवर नोकर भर्ती न केल्याने मधल्या काळात राज्य आणि केंद्र शासनाचा निधी ही परत गेला, आहे त्या सर्व बसेस रस्त्यावर आणण्यास परिवहन प्रशासन अपयशी ठरले आहे यामुळे उपन्न ही घटले , कामचुकार कर्मचारी वर्गावर ही अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन हालचाल करत नसल्याचा आरोप ही केला जातो. तर पालिका अनुदान देवून ही परिवहन उपक्रमाची परिस्थिती सुधारत नाही तर दूसरी कड़े कर्मचारी वर्गाचा पगार ही वेळेवर काढला जात नाही, करदात्या नागरिकांना सुविधा न मिळाल्याने अनेक तक्रारी पाहता बुधवार 21 जून रोजी सकाळी 11 वाजता पालिका मुख्यालय मधील महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक होणार आहे, यात महापौर देवळेकर झाड़ाझड़ती घेणार आहेत , या बैठक मध्ये महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, सर्व पक्षीय गटनेते, परिवहन समिती सभापती संजय पावशे, सर्व परिवहन सदस्य आणि अधिकारी वर्ग सहभाग घेणार आहेत, यात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे . 

सत्तेत आल्यावर अनेक ठिकाणी परिवहन बसेस सोडू अशी आश्वासन नागरिकांना दिली होती. काही ठिकाणी सुरु झाली तर काही ठिकाणी बसेस पोहचल्या नाही, नेमकी उपन्न का घटते, उपन्न वाढसाठी काय करावे, कुठे केडीएमटीच्या बसेस अडकतात यावर आढावा बैठक घेवून तोड़गा काढू, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.

Web Title: Mumbai news Kalyan Dombivali Municipal Transport bus