फी भरायला पैसा नाही, आत्महत्या करायची का?

रविंद्र खरात 
शनिवार, 17 जून 2017

पगाराबाबत पालिकेच्या लेखा विभागाकड़े पत्र व्यवहार केला असून केडीएमटीच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा पगार एक दोन दिवसात होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.

कल्याण - पावसाळा सुरु झाला, मुलांची शाळा ही सुरु झाली मुलांची फि भरायला, साहित्य खरेदी करायला खिश्यात पैसा नाही, जून महिन्याची 17 तारीख उजाडली मात्र पगार काही होईना घरात स्वयंपाकाची बोंबाबोंब... अशा अनेक अडचणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचारी वर्गासमोर उभ्या ठाकल्या असून शेतकऱ्यांप्रमाणे कर्मचारी वर्गाने आत्महत्या केल्यावर प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रममध्ये 538 हून अधिक कर्मचारी अधिकारी वर्ग काम करतात. दिवसेंदिवस केडीएमटीच्या बसेस रस्त्यावर कमी धावत असल्याने उपन्न घटले असून दूसरीकड़े पालिकेकडून प्रति महिना दीड कोटी रुपये अनुदान वेळेवर येत नसल्याने परिवहन उपक्रममधील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा मागील अनेक महिन्यात लाखो रूपयांचा पीएफ भरला नसून दूसरीकड़े जून महिन्याची 17 तारीख आली तरी पगार न झाल्याने कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ येते का ? अशी शक्यता नाकारता येत नाही.

मुलांची शाळा सुरु झाली, साहित्य खरेदी, बसची फी, ट्यूशन फी, शाळेची फी, घरातील किरकोळ खर्च, औषध उपचार आदी खर्च सांभाळता सांभाळता तारेवरची कसरत करावी लागत असून अनेक कर्मचारी अधिकारी वर्गावर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत. अनेकांनी येथील नोकरी सोडून नवी मुंबई, ठाणे मनपा परिवहन उपक्रममध्ये नोकरीस सुरवात केली आहे. तर आज उद्या परिस्थति सुधारेल अश्या आशेने काम करणाऱ्या केडीएमटी कर्मचारी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.

दूसरीकड़े ठेकेदारांचे कोट्यावधी रूपयांची थकबाकी न दिल्याने बसेस दुरुस्ती कड़े ठेकेदार कानाडोळा करत असल्याने रस्त्यावर येणारी बसेस संख्या ही घटत असून उपन्नही कमी होऊ लागल्याने केडीएमटी डबघाईला आली आहे. यामुळे पालिकेच्या अनुदानाचा टेकु घेवून केडीएमटी कार्यभार सुरु आहे. मात्र अनुदानही उशिर झाल्याने 17 तारीख उजाडली तरी पगार न झाल्याने अधिकारी वर्ग चिंताग्रस्त झाले असून पगार न झाल्याने घर खर्च आणि कर्ज कसे फेडा याचे असा प्रश्न समोर असून शेतकरी कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करतो तसा परिवहन कर्मचारी वर्गाने पगार मिळत नसल्याने आत्महत्या केल्यावर प्रशासन जागे होणार काय असा सवाल केला जात आहे.

पगाराबाबत पालिकेच्या लेखा विभागाकड़े पत्र व्यवहार केला असून केडीएमटीच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा पगार एक दोन दिवसात होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.

Web Title: Mumbai news Kalyan Dombivali municipal transport salary issue