फुग्यांसोबत बस विकणे आहे? पाहा KDMT'ची कशी उडतेय खिल्ली

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

फेरीवाल्याने बंद पडलेल्या बसेसला फुगे लावत व्यवसाय सुरू केलाय. यांचा संदर्भ जोडत केडीएमटी प्रशासनाची खिल्ली उडवली जात आहे. 

कल्याण : चक्क बंद पडलेल्या केडीएमटी बसचा आसरा घेत फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू करत जणू काही 'फुग्यासह केडीएमटी बस विकणे आहे' असे केडीएमटी प्रशासनाची खिल्ली उडवली आहे. यामुळे केडीएमटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. कल्याण डोंबिवली शहरात सध्या फेरीवाला आणि केडीएमटी बस सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

पालिका परिवहन विभागाच्या ताप्यात 218 बसेस पैकी 81 बसेस रस्त्यावर धावत असून त्यातील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे केडीएमटी डबघाईला येत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे खासगी ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्याने कल्याण पश्चिम परिसरात खराब झालेल्या बसेस गणेश घाट डेपोच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असल्याने केडीएमटीला घरघर आल्याचे समोर आले आहे. तर 22 ते 25 सीटच्या बसेस मधून 60 ते 80 प्रवासी घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने केडीएमटी कर्मचारी वर्ग त्रस्त आहेत. यामुळे केडीएमटीची घरघर काही संपेना असे चित्र दिसत आहे. दरम्यान शहरात फेरीवाला प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून अनेकांना पालिका आयुक्त पी. वेलरासू सांगत आहेत की फेरीवाल्यांकडून नागरिक माल खरेदी करत असल्याने फेरीवाले हटत नसल्याचे कारण समोर आहेत. आणि फेरीवाल्यांनी ही मस्त शक्कल लढविल्याचे समोर आले आहे.

कल्याण पश्चिममधील केडीएमटी गणेश घाट बाहेर बंद पडलेल्या बसेस उभ्या आहेत. त्याचा आसरा घेऊन फुगे विकत आहे. त्याने चक्क बंद पडलेल्या बसेसला फुगे लावले असून जणू काही केडीएमटी बस विक्री करणे आहे. असे चित्र समोर आल्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन होत असून केडीएमटी प्रशासन बसेस ची सुरक्षा प्रश्नी किती हलगर्जीपणा करत आहे. याचा राग ही व्यक्त केला जात आहे.

बसेस बंद असून डेपो मध्ये जागा कमी असल्याने डेपो बाहेर बसेस पार्क केल्या आहेत फेरीवाला फुगा लावून व्यवसाय करतो हे माहीत नाही असे असेल तर कारवाई करण्यास सांगतो अशी प्रतिक्रिया केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news kalyan dombivali peddler puts KDMT bus on sale