कल्याणमध्ये अर्धवट कामांमुळे रस्त्यावर गटारगंगा... नागरिक बेहाल

रविंद्र खरात 
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुसळधार पावसाने प्रमुख रस्त्यांत पाणी पाणी...
आगामी 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका आपातकालीन पथक सज्ज असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभागक्षेत्र अधिकारी वर्गाला सुचना दिल्याची माहिती पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी सकाळ ला दिली.

कल्याण : शनिवार रात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवली शहरात 4 झाड़े पडली तर पालिकेच्या अर्धवट रस्ते आणि गटाराच्या कामामुळे प्रमुख रस्त्यावर वर गटारगंगा वाहत होती यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास झाला .या मुसळधार पावसात कल्याण डोंबिवली मध्ये 4 झाड़े पडली मात्र कोणतेही दुर्घटना घडली नाही . 

कल्याण डोंबिवली शहरी ग्रामीण भागात 1 जून 2017 ते आज रविवार ता 20 ऑगस्ट 2017  सकाळी 7 वाजे पर्यंत एकूण 2324 मिमी पाऊस पडला असून मागील 24 तासात 31 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे .या मुसळधार पावसात कल्याण डोंबिवली मध्ये 4 झाड़े पडली मात्र कोणतेही दुर्घटना घडली नाही . शनिवार रात्री पासून पड़त असलेल्या मुसळधार पावसाने शहरी आणि ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडल्याने संथगतीने वाहनाची वाहतुक होत असल्याने वाहन चालक सहित नागरीक त्रस्त झाले आहेत . 

कल्याण पश्चिम मधील महंमदअली चौक ते शिवाजी चौक परिसरमध्ये रस्त्यालगत अर्धवट गटाराच्या कामामुळे नागरीक आणि व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, मुसळधार पावसाने त्या परिसरात गटारगंगा वाहत असल्याने त्या पाण्यामधून वाट काढत नागरिकांना आणि वाहन चालकाना जावे लागत होते, संतोषी माता रोड, मुरबाड रोड वरील केडीएमटी डिपो समोरील रस्त्यावर पाणी साचले होते त्यामुळे शिवाजी चौक, वालधुनी पुल, मुरबाड रोड, शहाड पुलावरील वाहतुक संथगतीने सुरु असल्याची माहिती कल्याण वाहतुक पोलिसांनी दिली . 

शहरी आणि ग्रामीण भागात पाणी आणि रस्ते खड्यात...
कल्याण पूर्व मधील चक्की नाका ते हाजी मलंग रस्त्यामधील फिपटी फिपटी धाबा ते रेलिश गार्डन रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना चांगलेच हाल झाले, तेथील अर्धवट रस्त्यामुळे पावसाळ्यात फटका बसत आहे,  कल्याण पूर्व मधील पूनालिंक रोड वर अनेक ठिकाणी पाणी साचले होते तर कचरा कुंडी मधील कचरा साफ न केल्याने मुसळधार पावसाने त्यामधील कचरा रस्त्यावर पडल्याने जागो जागी कचरा रस्त्यावर आला होता . खडेगोलवली नाला ओसडूंन वाहत होता तर कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानक जवळील बोगद्यामध्ये पाणी साठल्याने नागरिकांना चांगलाच त्रास झाला पाण्यामधून वाट काढत रेल्वे स्टेशन गाठावे लागले . 

शहाड ते वरप गाव रस्ता खड्डेमय...
कल्याण अहमदनगर महामार्गावरील शहाड पुल ते वरप गाव परिसर मधील रस्त्यात भले मोठे खड्डे पडल्याने पावसाने डबकी निर्माण झाल्याने वाहन चालका सहित नागरिकांचे हाल झाले, म्हारळ नाका, वरप गाव, रस्त्यावर पाणी आल्याने वाहनाची वाहतुक संथगतीने सुरु होती याचा फटका बाहेर गावातुन येणाऱ्या एसटी मधील प्रवासी वर्गाला झाला .

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news kalyan dombivali rains disrupt roads