'पुन्हा पावसामुळे त्रास होणार नाही अशी उपाययोजना करा'

रविंद्र खरात 
सोमवार, 26 जून 2017

पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होणार नाही याची उपाययोजना करा --पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिले अधिकारी वर्गाला आदेश 

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शनिवारी (ता. 24 जून) सखल भागासह ग्रामीण भागात अर्धवट रस्ते, छोटे नाले गटारे साफ न झाल्याने जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पुन्हा मूसळधार पावसात नागरिकांना त्रास होणार नाही, याची उपाय योजना करा असे आदेश पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी अधिकारी वर्गाला दिले आहेत. आपातकालीन विषयावर आज सोमवार ता 26 रोजी पालिका मुख्यालय मध्ये पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी पालिका अधिकारी वर्गाची बैठक घेतली होती. 

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शनिवार 24 जून  पासून पडलेला पाऊस 151 मि मि पडला , यात पालिकेच्या कामाचा पोल खोल केला, डोंबिवली मध्ये अनेक ठिकाणी पानी साचले , कल्याण पश्चिम मधील काही भागात, अटाळी, बल्याणी आणि कल्याण पूर्व मधील ग्रामीण भागातील पिसवली, नांदवली, 100 फुट रस्ता, द्वारली या परिसरामधील अर्धवट रस्ते तर काही ठिकाणी नालेच बनविले नसून, अर्धवट कामांचा फटका सर्व सामान्य नागरिकांना त्रास झाला यामुळे अनेक ठिकाणी कचरा न उचलल्याने पावसाच्या साठलेले पाण्याच्या निचरा न झाल्याने अनेक रस्त्यावर पानी साचले होते. याबाबत आज सोमवार ता 26 रोजी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेत उपाय योजनेचे सूचना दिल्या. 

अर्धवट काम मार्गी लावा , रस्त्यात पडलेला कचरा , नागरिकांनी रस्त्यात टाकलेला ड्रेबिज त्वरित उचला , सखल भाग आणि प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसर मध्ये आपातकालीन वाहनाची व्यवस्था करा. मुसळधार पावसात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही त्यासाठी उपाय योजना करा , मुसळधार पाऊस सुरु असेल आणि त्यादिवशी भरती असेल तर सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पूर्वसूचना द्या. आणि आपातकालीन पथक सज्ज ठेवा. यामुळे नागरिकांना त्वरित मदत होईल असे आदेश दिल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी सकाळला दिली . 

शासनाला अहवाल सादर...
मुसळधार पावसात डोंबिवली मधील सरोवर नगर मधील काही घरावर वीज पडली होती याबाबत तलाठी मार्फ़त पंचनामा करण्यात आला असून तो अहवाल जिल्हाधिकारी मार्फ़त राज्यशासनांकड़े पाठविला असल्याची माहिती कल्याण तहसिलदार अमित सानप यांनी दिली , कल्याण तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणाने आपातकालीन परिस्थिती मध्ये एकत्र येवून काम करण्याचे सूचना दिल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी यावेळी दिली .

Web Title: mumbai news kalyan dombivali rains disruption