खड्डेमय रस्त्यांमुळे मान, पाठदुखीच्या रुग्णांत वाढ; तरुणांची संख्या जास्त

रविवार, 15 ऑक्टोबर 2017

शहरातील खड्डे हां चिंतेचा विषय आहे, सर्व सामान्य माणसाच्या 45 वर्षानन्तर हाडांचे विकार, आजार सुरु होतात, मात्र आजकाल 25 ते 40 वयोगट मधील रुग्ण वाढले आहेत प्रति 10 रुग्णा मध्ये 4 ते 5 रुग्ण कंबर, मान, पाठ दुखीची तक्रार करत आहेत

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते खड्डेमय झाले असून परतीच्या पावसाने नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्डे तर जीवघेणे झाले असून शहरातील नागरिकांना मान, पाठ, कंबरदुखी वाढ सोबत डोळ्यांचे विकार वाढल्याचे डॉक्टर वर्ग सांगत असून त्यात तरुणांची संख्या जास्त आहे.

कल्याण पूर्व पश्चिम आणि ग्रामीण भागात प्रमुख रस्त्यासोबत अंतर्गत असलेल्या खड्डेमय रस्त्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजाराने नागरीक त्रस्त असतात यावर्षी परतीच्या पावसाने एकीकडे साथीच्या आजाराने डोके वर काढले असून 10 रुग्णामध्ये 4 ते 5 रुग्ण पाठ, मान, कंबर दुखणे असलेले आहेत अशी माहिती खासगी डॉक्टर वर्ग देत आहेत. यात मोटार सायकल आणि रिक्षा चालक आणि प्रवासी वर्ग यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

नेमकी काय घडते...
अनेक भागात खड्डा की रस्ता आहे याचा अंदाज न आल्याने वाहने खड्यांमधून जात असल्याने जोरदार नागरिकांना झटके, दणका, आदळने, असे प्रकरात वाढ झाल्याने मणक्यामध्ये गॅप पडणे, चकती सरकणे, मानदुखी, पाठदुखी सारखे आजार म्हना तक्रारी घेवून येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे. यात उपाय रुग्णाच्या आजराचे लक्षण नुसार आम्ही करत असल्याचे तज्ञ डॉक्टर सांगत आहेत, सध्या च्या महागाईच्या काळात हा उपचार महागड़ा असला तरी घरगुती उपाय टाळावेत असे आवाहन डॉक्टर वर्ग करत आहेत.

डोळ्यांचे आजार वाढले...
शहरातील प्रमुख मार्गच खराब झाल्याने व वाहतुकीची वर्दळ नेहमी असल्याने धुलीकणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावरुन एखादे अवजड वाहन गेल्यास धुळीचे लोटच्या लोट तयार होत आहेत. धुळीकण डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यातील ओलावा कमी होणे, जळजळ वाढणे, पापण्याचा कडा सुजणे, लाइट किंवा सूर्यप्रकाश सहन न होणे आदी प्रकारासह काहीवेळा डोळ्यांमंध्ये जंतूसंसर्ग होण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे तर एक व्हायलर डोळ्याचा आजार सुरु झाला आहे आणि तो तरुणामध्ये जास्त दिसून येत आहे तो म्हणजे एकच डोळा लाल होने आणि हा आजार तब्बल 15 दिवस बरा होण्यास लागत असल्याचे मत डॉक्टर. डोळ्यांचे तज्ञ डॉक्टर अर्चना लावणकर यांनी केले आहे.

परतीच्या पावसाने खड्डेमय रस्तेमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे यामुळे डोळ्यांचे विकार वाढतात हे खरे असून, यावर्षी एक आजार व्हायलर झाला असून अचानक एक डोळा लाल होतो. आणि 20 ते 40 वयोगट मधील हे रुग्ण जास्त असून प्रति दिन 2 रुग्ण येत आहेत यावर तब्बल 14 ते 15 दिवस उपचार घ्यावा लागत असून घरगुती किंवा स्वतः मेडिकलमध्ये जाऊन औषध उपचार घेणे टाळावे तज्ञाचा सल्ला घ्या असे आवाहन डोळ्यांचे तज्ञ डॉक्टर अर्चना लावणकर यांनी केले आहे.

शहरातील खड्डे हां चिंतेचा विषय आहे, सर्व सामान्य माणसाच्या 45 वर्षानन्तर हाडांचे विकार, आजार सुरु होतात, मात्र आजकाल 25 ते 40 वयोगट मधील रुग्ण वाढले आहेत प्रति 10 रुग्णा मध्ये 4 ते 5 रुग्ण कंबर, मान, पाठ दुखीची तक्रार करत आहेत. यात रिक्षा, बाईकस्वार सोबत प्रवासी वर्ग ही आहेत.  जेष्ठ नागरिक यांच्यामधील हाडांचे फेक्चर प्रमाण वाढले आहे त्याला ही खड्डेच जबाबदार आहेत, मोटार सायकल सवार सोबत रिक्षा चालक आणि त्यातील प्रवासी ही ह्या तक्रारी घेवून येत आहेत. आजकाल आजारावर अनेक उपाय इंटरनेटच्या जमान्यात समोर आहेत. मात्र डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घरगुती उपाय करू नयेत. यामुळे आजार कमी होण्याऐवजी जास्त वाढल्याची चित्र समोर असून कोणताही आजारमध्ये डॉक्टरच्या सल्ला घेण्याचे आवाहन अस्थिरोग तज्ञ डॉ राजेंद्र लावणकर यांनी केले असून आपणच आपली काळजी घेतली नाही तर या आजराचे रुग्ण वाढण्याची चिंता यावेळी व्यक्त केली.

Web Title: mumbai news kalyan dombivali roads patholes