बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात आरटीओ, पोलिसांची कारवाई

रविंद्र खरात 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पोलिस, आरटीओ आणि वाहतुक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली शहरात बेशिस्त आणि बेकायदा रिक्षा चालका विरोधात मोहिम उघड़ली होती

कल्याण : डोंबिवली मधील बेशिस्त रिक्षा चालका विरोधात आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी मोहिम उघड़ली होती मात्र सण सूद असल्याने त्याला ब्रेक लागला होता तो संपताच पुन्हा गुरुवार ता 10 ऑगस्ट पासून डोंबिवली मध्ये कारवाई सुरु झाल्याने बेशिस्त आणि बेकायदा रिक्षा चालविणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांनी बेकायदा रस्ते अडविल्याने सर्व सामान्य नागरिकाला रेल्वे स्थानक गाठण्यास कठीन झाले होते ही समस्या दूर करण्यासाठी पालिका आयुक्त पी वेलरासु यांच्या दालनात काही दिवसापूर्वी पालिका आयुक्त यांच्या सहित आरटीओ अधिकारी संजय ससाणे, पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड, आदीनी सहभाग घेतला होता, तदनंतर पोलिस, आरटीओ आणि वाहतुक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली शहरात बेशिस्त आणि बेकायदा रिक्षा चालका विरोधात मोहिम उघड़ली होती, मात्र रक्षाबंधन सण आल्याने या कारवाईला थांबविण्यात आली होती .आता गुरुवार ता 10 ऑगस्ट पासून वाहतुक शाखेचे गोविंद गंभीरे, आरटीओ पोलिस निरीक्षक शिंदे आणि स्थानिक पोलिसाच्या पथकाने डोंबिवलीच्या विविध भागात कारवाई केली, 619 रिक्षाची तपासणी करण्यात आली, 34 जणांची कागदपत्र अपूर्ण असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून 16 वर्ष पूर्ण होवून ही बेकायदेशीर भंगार रिक्षा रस्त्यात धावत असल्याचे समोर आले आहे त्यात 7 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत . यामुळे बेकायदा आणि बेशिस्त रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत . 

पालिका मधील बैठकनंतर बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात वाहतुक पोलिसासमवेत आरटीओची कारवाई सुरु आहे, डोंबिवली नंतर ही अन्य भागात कारवाई होईल, राहिला प्रश्न वाढीव भाड़े प्रश्न, लवकरच सर्व रिक्षा संघटना मधील पदाधिकारी प्रतिनिधी आरटीओ अधिकारी समवेत सर्वे करून रिक्षा चालकांची समज काढली जाईल आणि तदनंतर धड़क कारवाई करू अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सकाळला दिली .

Web Title: mumbai news kalyan dombivli illegal rickshaw