पाऊस पडूनही कल्याण पूर्वमध्ये 2 दिवस पाणी कमी दाबाने

रविंद्र खरात
रविवार, 25 जून 2017

उल्हास नदीच्या पात्रात मागील 24 तासांत मुसळधार पावसामुळे जलपर्णी वनस्पती वाहून आले.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्द आणि ग्रामीण भागात मागील 24 तासांत 151 मिमी पाऊस पडूनही कल्याण पूर्वमधील नागरिकांना पुढील दोन दिवस पाणी समस्येला जावे लागणार आहे . 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका आपल्या हद्दीत नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी उल्हासनदी मधून पाणी उचलते, मात्र उल्हास नदीच्या पात्रात मागील 24 तासांत मुसळधार पावसामुळे जलपर्णी वनस्पती वाहून आले. त्यामुळे पाणी पंप करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत कळविले असून, पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे जाहीर केले आहे. मात्र पाऊस पडून ही पाणी समस्या का असा सवाल कल्याण पूर्वकर करत आहेत 

Web Title: mumbai news kalyan dombivli water supply rains