केडीएमटी बस ब्रेक डाउन आणि चक्का जाम... नागरिक हैराण

रविंद्र खरात
सोमवार, 26 जून 2017

पावसाळ्यात प्रतिदिन रस्त्यावर धावणारी बस कधी बंद पडेल याची कारणे अनेक आहेत, त्यावर भविष्यात नियंत्रण आणले जाईल, बस बंद पडल्यावर काही वेळात दूसरी बस सोडली असल्याची माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली. 

कल्याण : तब्बल चार दिवस कल्याण हाजीमलंग रस्त्यावर धावणारी केडीएमटी बस बंद होती. ती सोमवार ता 26 जून रोजी सुरु करण्यात आली, मात्र दुपारी दीडच्या सुमारास भरगच्च भरलेली केडीएमटी बस कल्याण एसटी डेपोमधून बाहेर पडली. मात्र गेटवर ब्रेक डाउन झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. गेटवर बस बंद पडल्याने, एसटी, केडीएमटीच्या बसेस डेपो बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली, त्यामुळे एसटी डेपो समोर काही काळ वाहनाच्या रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या 100 पेक्षा जास्त बसेस रस्त्यावर काढून जनतेला सेवा दया , 1 जुलै पासून पुढील 3 महिन्यात उपन्न वाढविले नाही तर केडीएमटीची खासगीकरण करू असा दम महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला होता , त्यामुळे केडीएमटी प्रशासन जोमाने काम करेल असे वाटले मात्र प्रति दिन 60 ते 65 पेक्षा बस रसत्यावर काढण्यासाठी केडीएमटी प्रशासनाला चांगलाच घाम फूटत आहे . प्रशासन आणि परिवहन समिती सदस्य अपयशी ठरले आहेत . 

नेवाळी परिसर मध्ये गुरुवार ता 22 जून रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते यात अनेक वाहनाची तोड़फोड़ करण्यात आली होती  , सुदेवाने केडीएमटी बसेसची तोड़फोड़ झाली नाही मात्र त्या दिवसापासून त्या मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या , आज सोमवार ता 26 जून सकाळी 8 वाजल्या पासून कल्याण हाजीमलंग मार्गावर बसेस पुन्हा सुरु झाल्या त्यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यानी चांगलीच गर्दी केली होती, मात्र दीड च्या सुमारास भरगच्च भरलेली केडीएमटी बस (एम.एच. 05 आर 1118) एसटी डेपो च्या गेट वर ब्रेक डाउन झाल्याने प्रवाश्याची चांगलेच हाल झाले. तब्बल 20 मिनिटाने दूसरी बस सोडण्यात आली. गेट वरच बस बंद पडल्याने डेपो मधून अन्य बसेस बाहेर पडन्यास वेळ लागत असल्याने एसटी डेपोसमोर वाहनाची रांग लागल्याने चक्का जाम झाला यामुळे नागरिक त्रस्त झाले , या घटनेने केडीएमटी च्या कारभाराचा पोल खोल झाला असून खासगिकरण झाल्यावर अधिकारी जागे होणार का असा सवाल केला जात आहे .

 

Web Title: mumbai news kalyan kdmt bus break down