लोकलच्या महिला डब्यांत जागेवरून प्रवाशांमध्ये मारहाणीचं सत्र सुरूच

बुधवार, 13 सप्टेंबर 2017

बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास 4 ते 5 महिलांनी केली 54 वर्षीय महिलेला केली मारहाण 

कल्याण : महिलांना सर्व क्षेत्रात रोजगार उपलब्ध दिला मात्र त्यांना रोजगाराच्या ठिकाणी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून त्याचे पडसाद रेल्वेच्या लोकल मध्ये दिसून येत आहे . लोकल मध्ये जागा पकडण्यावरुन महिला प्रवाशी वर्गात हाणामारी सत्र सुरु असून डोंबिवली मधील एका 54 वर्षीय महिलेला कल्याण हुन मुंबई कडे जाणाऱ्या लोकल मध्ये लोकल मधील काही महिलांनी मारहाण केल्याने एकच खळबळ माजली असून रेल्वे प्रशासन लोकल वाढवत नसल्याने प्रवासी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे .

डोंबिवली रेल्वे स्थानक मधून प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र लोकल मध्ये चढताना जागा मिळत नसल्याने अनेकांना कल्याण रिटर्न गाड़ी मध्ये बसावे लागत आहे ,अनेक वेळा प्रवासी संघटनाकडून मागण्या होवून ही रेल्वे प्रशासनकडून कानाडोळा होत असल्याने आता प्रवासी वर्गात आता वाद होवू लागले आहेत . डोंबिवली मधून लोकल मध्ये चढण्यास मिळत नसल्याने डोंबिवली मधील महिला चारुमती वेल्हाळ यांनी आज बुधवार ता 13 सप्टेबर रोजी सकाळी डोंबिवली स्थानकातून सकाळी 8.21 ला कल्याणासाठी धावणाऱ्या लोकल पकडली ही लोकल कल्याण येथुन  सकाळी 8.36 ला सीएसटीसाठी निघते, पण बुधवारी ही लोकल आज  10 मिनिटं उशिराने पोहोचल्याने गोंधळ झाला, लोकल खचाखच भरून आल्याने कल्याणच्या महिला संतापल्या आणि जागा का अडवली जा येथून आणि काही महिलांनी चारुमती वेल्हाळ यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली . तर काहीनी मारहाण करण्यास सुरुवात केली, अंगवरील ड्रेस ही फाडला, याच काळात काही महिलांनी लोकलची चैन खेचली मात्र कुठल्याही सुरक्षा यंत्रणाने या प्रकाराकडे बघितले नसल्याची खंत पीड़ित महिला चारुमती वेल्हाळे यांनी व्यक्त केली . अखेर सदर महिलेने मुंबई सीएसटी मध्ये गेल्यावर काही महिलांच्या मदतीने रेल्वे पोलिसाकडे जात आपली व्यथा सांगत तेथे अज्ञात महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे . या घटनेमुळे रेल्वे प्रशासन जागे होवून डोंबिवली मधील महिलासाठी लोकल सोडणार का असा सवाल केला जात आहे .

डोंबिवली रिटर्न लोकल कमी ज्या येतात त्या येतात त्या कल्याण, कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापुर, टिटवाला येथून येतात सकाळच्या सत्रांत या भरलेल्या असतात, लोकल मध्ये महिला डब्बा असो अन्य डब्यात जाण्यासाठी कसरत करावी लागते, वेळप्रसंगी लटकत प्रवास करावा लागतो, डोंबिवली मध्ये ही काही प्रवासी रिटर्न येवून प्रवास करतात मात्र आम्ही कुणाला त्रास देत नाही मात्र कल्याण मधील महिलांनी कहर केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आजच्या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असून लोकल मध्ये महिलांचे डब्बे वाढविले पाहिजे त्या सोबत सकाळच्या सत्रांत महिला स्पेशल लोकल वाढविल्या पाहिजे अशी मागणी तेजस्वनी महिला रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्षा लता अरगड़े यांनी केली आहे , 

मी क़ाय गुन्हा केला आहे, रेल्वेचा अधिकृत पास काढून प्रवास करत आहे, रिटर्न येवून प्रवास करू नये असा रेल्वे ने कायदा बनविला नाही तर या महिलांच्या पोटात का दुखते ये समजत नाही, डोंबिवली मध्ये लोकल मध्ये चढ़ण्यास मिळत नाही म्हणून काल पासुन या लोकल ने प्रवास करत आहे काल ही गोंधळ घातला होता आज तर कहर केला, मला मारहाण करत धक्काबुक्की केली कायदेशीर या महिलावर कारवाई व्हावी, आज लोकल सुरु होताच चैन खेचुन ही सुरक्षा यंत्रणाने कारवाई केला नसल्याचा संताप व्यक्त करत पुढे म्हणाल्या की रेल्वे प्रशासनने ही महिलासाठी ज्यादा लोकल द्याव्या अशी माफक अपेक्षा पीड़ित महिला चारुमती वेल्हाळ यांनी व्यक्त केली. घटना समजली आहे, मुंबई मध्ये गुन्हा दाखल झाला असून तो आमच्या पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग होताच कायदेशीर कारवाई करू अशी माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली .

Web Title: mumbai news kalyan locan train ladies fight over seats