रिक्षा चालकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

  • तिच्या मित्रालाही केली मारहाण
  • कल्याण पूर्व मधील घटना

कल्याण : कल्याण-शिळ रस्त्यावर एका अल्पवयीन विद्यार्थ्यानीचे अपहरण करून विनयभंग केल्याची घटना ताजी असताना कल्याण पूर्वमध्ये रविवार (ता. 25 रोजी) सायंकाळी 6 च्या सुमारास पुन्हा एका रिक्षा चालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करत तिच्या मित्राला मारहाण केल्याची घटना उघड़कीस आली असून, कल्याण पूर्वमध्ये रिक्षा चालकांच्या विरोधात संतापाचे वातावरण असून कल्याण पूर्वमधील रिक्षा प्रवास खरच महिलासाठी सुरक्षित आहे का, असा सवाल केला जात आहे. 

कल्याण शिळ रोडवरील टाटा पॉवर जवळ एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून विनयभंगाची घटना ताजी असताना कल्याण पूर्वेकडील गणेशनगर परिसरात राहत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी रविवार (ता. 25) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या मित्रा सह  कल्याण पूर्वमधील पुना लिंक रोडने घराच्या दिशेने जात असताना  तिच्या ओळखीचा चिराग शिंदे नावाचा तरुण रिक्षाचालक रिक्षा घेऊन समोरच्या बाजूने आला. त्याने मला पागल का बोलली तुझी हिंमत कशी तिचा हात पकडत तिला अश्लील शिवीगाळ केली.

या दरम्यान तिच्या मदतीस आलेल्या तिच्या मित्राला शिंदे याने मारहाण केली. यामुळे पुन्हा कल्याण पूर्वमधील रिक्षामध्ये महिलांचा प्रवास सुरक्षित आहे का असा सवाल केला जात आहे. याप्रकरणी त्या पीडित विद्यार्थिनीने कोळशेवाडी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून, या तक्रारी नुसर पोलिसांनी चिराग शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्या रिक्षाचालक चिराग शिंदे याचा शोध घेत आहेत .

Web Title: mumbai news kalyan rickshaw driver molests girl