कमला मिल आगीप्रकरणी आणखी एक संचालक अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल कम्पाउंडमध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीप्रकरणी मिलचा आणखी एक संचालक रमेश गोवानी यांना एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी चेंबूर येथून अटक केली. मिलमधील आस्थापनांत बेकायदा बांधकाम झाल्याची माहिती होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. 

पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकताच या आगीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. या कम्पाउंडमधील बेकायदा बांधकामांची मिलचे संचालक रवी भंडारी आणि गोवानी यांना माहिती होती, असे त्यात नमूद आहे. याप्रकरणी भंडारी यांना अलीकडेच अटक झाली होती. सोमवारी गोवानी यांना अटक करण्यात आली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (मध्य प्रादेशिक परिमंडळ) जयकुमार यांनी दिली. 

कम्पाउंड परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या "वन अबोव्ह' व मोजोस ब्रिस्ट्रो या पबविरोधात मुंबई महापालिकेने तक्रार नोंदवली होती. "वन अबोव्ह'मध्ये 30 मीटर रुंद व पाच मीटर उंच बेकायदा बांधकाम झाले. तेथील दोन खोल्यांमध्ये 13 बाय 3 च्या शीट बसवण्यात आल्याचेही तक्रारीत महापालिकेने नमूद केले होते. "मोजोस'मध्ये बेकायदा शेड असल्याचे पालिकेच्या पाहणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर "मोजोसच्‌'या युग पाठक, युग तुली तसेच "वन अबोव्ह'च्या अभिजित मानकर व संघवी बंधू यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणांतही गोवानी यापूर्वी यांच्याविरोधात मुंबई प्रादेशिक नियोजन व नगररचना कायदा, 1956 (एमआरटीपी)अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

Web Title: mumbai news Kamala Mills Compound crime