"सीबीआय' चौकशीसाठी न्यायालयात याचिका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये झालेल्या अग्निकांडाची "सीबीआय' चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गर्व सूद या अठरा वर्षांच्या तरुणाने दाखल केलेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. 

कमला मिल कंपाउंडमधील वन अबोव्ह पबमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. या कंपाउंडमध्ये असलेली पन्नासहून अधिक बेकायदा कार्यालये, पब-हॉटेलमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणेसंदर्भातील नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसतानाही ही कार्यालये, हॉटेलांना परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्‍न याचिकादाराने केला आहे. याचिकेवर सुटीनंतर नियमित न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

आगीप्रकरणी पोलिसांनी "वन अबोव्ह' पबच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे; मात्र तेवढे पुरेसे नाही. कमला मिल कंपाउंडमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आस्थापनांना परवानगी कशी देण्यात आली, त्यासाठी कमला मिलच्या मालकांना जबाबदार धरायला हवे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. "सीबीआय'ने या घटनेची चौकशी करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. 

Web Title: mumbai news Kamala Mills fire court