केडीएमसी महापौरांना अखेर दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कल्याण - कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक बंदी नसल्याबाबतचे देवळेकर यांचे म्हणणे ग्राह्य मानत उच्च न्यायालयाने कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे.  

न्यायालयाच्या या निर्णयामुळे मेपर्यंतचा कार्यकाळ देवळेकर पूर्ण करू शकणार आहेत. २०१० च्या निवडणुकीनंतर देवळेकर यांच्याबाबत निर्णय देताना त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. तसेच त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक बंदी लागू करण्यात आली होती, अशी तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुन म्हात्रे यांनी केली होती.  उच्च न्यायलयाने याबाबत देवळेकर यांचे म्हणणे मान्य करत त्यांचे नगरसेवकपद कायम ठेवले. पर्यायाने देवळेकर यांचे महापौरपदही कायम राहिले आहे. आपल्या उर्वरित कार्यकाळात आपण जोमाने काम करू, असा विश्‍वास निकालानंतर देवळेकर यांनी व्यक्त केला.

Web Title: mumbai news kdmc mayor Rajendra Devlekar