आपत्कालीन कक्ष ओस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कल्याण -मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ३५० हून अधिक अधिकारी कर्मचारी जुंपल्याने केडीएमसी मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष ओस पडले होते. दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांकडून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी कक्षात फोन केले जात होते; मात्र ते कोणीही उचलत नव्हते. काहींनी माहितीसाठी, तक्रारीसाठी थेट कक्ष गाठले असता त्यांनी कार्यालयात कोणीही नसल्याने निदर्शनास आले. त्यामुळे कोणतीही तक्रार नोंद झाली नाही. दरम्यान आयुक्त पी. वेलरासु यांच्या हे लक्षात येताच दुपारी २ नंतर तेथे एक अधिकारी रुजू झाला. 

कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पालिकेने २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू केला आहे. या कक्षाला महापालिका परिसरातील १० प्रभाग क्षेत्र कार्यालय जोडली गेली आहेत. पावसाळ्यात झाडे पडली, पाणी साचले, ड्रेबिज, साप आला आदी तक्रारी मुख्य कार्यालयात आल्यावर त्या प्रभाग क्षेत्र कार्यालयातील आपत्कालीन कक्षात कळविल्या जातात, केलेले काम वरिष्ठांना कळवले जाते. कल्याणमधील आपत्कालीन कक्षात १ जून ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीसाठी पथकाची नेमणूक करण्यात आली असून त्यात दोन पथकप्रमुख २४ तास काम करतात. मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक कामासाठी केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली असून त्यात आपत्कालीन कक्षातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.. सुरक्षा रक्षक आणि वाहकाच्या भरोशावर कक्ष सोडण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याबाबत आयुक्त पी. वेलरासू यांना फोन केल्यावर पुढील सूत्रे हलली. 

२४ तास आपत्कालीन कक्षात अधिकारी असणे गरजेचे आहे. नसेल, तर ती गंभीर बाब आहे. निवडणूक कामामुळे मनुष्यबळ कमी आहे; मात्र पर्यायी अधिकारी का दिला नाही, याची जरूर चौकशी करू. पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना दिली आहे.  
- पी. वेलरासू, आयुक्त, पालिका

Web Title: mumbai news kdmc Mira-Bhayander Municipal Corporation