उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई  - अत्यंत चुरशीच्या लढतीत कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला; परंतु राज्य सरकारकडून पालिकेला सापत्न वागणूक मिळत असल्याचे गाऱ्हाणे घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक-आयुक्‍त यांच्यात सतत वादाचे प्रसंग निर्माण होतात. नगरसेवकांना हक्‍काचा विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. महापालिकेतील विकासाचे पायाभूत प्रकल्प मार्गी लागत नसून, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा संतापही शिवसेना नगरसेवकांनी व्यक्त केला होता. या संदर्भात आज बैठक झाली. 

उद्धव ठाकरे यांनी पालिकेतील प्रकल्प आणि नगरसेवकांच्या तक्रारीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. या वेळी याप्रकरणी लक्ष घालून तातडीने निर्णय घेण्याची सूचना पालिका प्रशासनाला देण्याची ग्वाही मुख्यंमत्र्यांनी दिली. कल्याण-डोंबिवली विकास प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यावर बैठकीत चर्चा झाली. "एलबीटी' व "जीएसटी'चे अनुदान महापलिकेला मिळत नसल्याने स्थानिक योजना व उपाययोजना यावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणण्यात आली. राज्य सरकारकडे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

Web Title: mumbai news kdmc uddhav thackeray devendra fadnavis