कोल्हापूर-मुंबई 'शिवशाही' दसऱ्यापासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबई-कोल्हापूरदरम्यान दसऱ्यापासून एसटी महामंडळाची "शिवशाही' ही वातानुकूलित बससेवा सुरू होईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच केली. या बसचे तिकीट 620 रुपये असेल.

मुंबई - मुंबई-कोल्हापूरदरम्यान दसऱ्यापासून एसटी महामंडळाची "शिवशाही' ही वातानुकूलित बससेवा सुरू होईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच केली. या बसचे तिकीट 620 रुपये असेल.

कोल्हापूर व मुंबई सेंट्रल येथून शनिवारपासून (ता. 30) रात्री 10 वाजता एकाच वेळी या बससेवेला सुरवात होईल. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली "शिवशाही' बससेवा मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, रत्नागिरी-कोल्हापूर व मुंबई-अलिबाग या मार्गांवरही सुरू आहे.

Web Title: mumbai news kolhapur-mumbai shivshahi bus service