कायद्याचे पेपर तपासण्यास वकील संघटनेला विनंती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - कला व विज्ञान शाखेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने कायदा विषयाचा निकाल लवकर लावण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या आठवड्यात कायदा विषयातील काही परीक्षांचे निकाल जाहीर होतील. दरम्यान, उत्तरपत्रिका तपासणीला वेग येण्यासाठी विद्यापीठाने वकील संघटनांना पुन्हा विनंती केली आहे. 

ऍडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (आवी) संघटनेला मुंबई विद्यापीठाने पत्र लिहून वकिलांना उत्तरपत्रिका तपासण्याची विनंती केली. या संघटनेच्या वकिलांना सोमवारपासून उत्तरपत्रिका तपासणीसाठी नाव नोंदविण्याचे संदेश जात आहेत, अशी माहिती "आवी'चे सदस्य ऍड. विनोद सांगवलीकर यांनी दिली. किमान दोन वर्षे शिकवणीचा अनुभव असलेल्या वकिलांनी स्वतःहून नावे उत्तरपत्रिका तपासणीसाठी द्यावी, असा संदेश दिला आहे. 

विद्यार्थी नापास होण्याची भीती  
या निर्णयावर स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वकिलांना उत्तरपत्रिका तपासण्यास दिल्यास गुणांवर मोठा परिणाम होईल. यापूर्वी कायदा विषयाच्या सर्व निकालांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांना तर केवळ दोन गुण मिळाल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे; मात्र केवळ निकाल घाईत आटोपण्याकडे भर दिल्यास भविष्यात कायदा विषयांत विद्यार्थी नापासच झाल्याचे दिसतील, असेही ते म्हणाले. 

Web Title: mumbai news law exam