धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱ्याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे पश्‍चिम रेल्वेने गुरुवारी स्पष्ट केले.

लोहमार्गालगतच्या झोपड्यांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड भिरकावतात. मागील काही महिन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत पश्‍चिम रेल्वेमार्गावर असे 34 प्रकार घडले. दगड भिरकावणारा माथेफिरू किंवा समाजकंटक दोषी ठरल्यास रेल्वे नियमानुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा ती भोगल्यानंतर त्यात आणखी 10 वर्षांची वाढ करण्याची तरतूद कायद्यात असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Web Title: mumbai news life imprisonment punishment by stone attack on railway