लोकल फर्स्ट क्‍लासचे तिकीट दर जुलैपासून वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - जीएसटी (वस्तू व सेवा कर) 1 जुलैपासून लागू केला जाणार असल्याने रेल्वेच्या लांब पल्ल्याचा वातानुकूलित (एसी) प्रवास महागणार आहे. एसी प्रवासात सध्या सेवा कर लागू केला जातो. त्याऐवजी जीएसटी लागू झाल्यानंतर तिकीट शुल्कावर थोडाफार परिणाम होणार असल्याचे यापूर्वीच रेल्वेने स्पष्ट केले होते. यासह मुंबई उपनगरी लोकलच्या फर्स्ट क्‍लासच्या तिकिट दरातही वाढ होणार आहे. मात्र, ही वाढ किरकोळ असेल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. मुंबई उपनगरी लोकलच्या फर्स्ट क्‍लास प्रवासावर 4.5 टक्‍के सेवा कर लागू केला जातो. जीएसटीमुळे हा कर थेट पाच टक्‍के होईल.

मुंबई - जीएसटी (वस्तू व सेवा कर) 1 जुलैपासून लागू केला जाणार असल्याने रेल्वेच्या लांब पल्ल्याचा वातानुकूलित (एसी) प्रवास महागणार आहे. एसी प्रवासात सध्या सेवा कर लागू केला जातो. त्याऐवजी जीएसटी लागू झाल्यानंतर तिकीट शुल्कावर थोडाफार परिणाम होणार असल्याचे यापूर्वीच रेल्वेने स्पष्ट केले होते. यासह मुंबई उपनगरी लोकलच्या फर्स्ट क्‍लासच्या तिकिट दरातही वाढ होणार आहे. मात्र, ही वाढ किरकोळ असेल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. मुंबई उपनगरी लोकलच्या फर्स्ट क्‍लास प्रवासावर 4.5 टक्‍के सेवा कर लागू केला जातो. जीएसटीमुळे हा कर थेट पाच टक्‍के होईल. त्यामुळे तिकीटासह सलवतीच्या पासमध्येही किरकोळ वाढ होईल. पाच रुपये, 10 रुपये याप्रमाणे ती वाढ असेल.

Web Title: mumbai news Local First Class ticket